शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खोदकामात बीएसएनएलचे केबल तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:50 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील गाडगेनगर, राधानगर व विनायकनगरात अमृत योजनेंतर्गत पाइप लाइन टाकण्याची कामे सुरू आहे. त्यासाठी काँक्रीट रस्ते खोदकाम करण्यात आले. यावेळी बीएसएनएलचे अंडरग्रऊंड केबल तुटल्याने या परिसरात सेवा खंडीत झाल्याची नागरिकांची ओरड आहे.एका विभागाचा विकास करताना जर दुसऱ्या विभागाची नासधूस होणार असेल तर त्याला विकास म्हणायचा काय, असा सवालही ...

ठळक मुद्देनागरिकांचे दूरध्वनी बंद : कारवाईची अपेक्षा

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील गाडगेनगर, राधानगर व विनायकनगरात अमृत योजनेंतर्गत पाइप लाइन टाकण्याची कामे सुरू आहे. त्यासाठी काँक्रीट रस्ते खोदकाम करण्यात आले. यावेळी बीएसएनएलचे अंडरग्रऊंड केबल तुटल्याने या परिसरात सेवा खंडीत झाल्याची नागरिकांची ओरड आहे.एका विभागाचा विकास करताना जर दुसऱ्या विभागाची नासधूस होणार असेल तर त्याला विकास म्हणायचा काय, असा सवालही या वेळी उपस्थित होत आहे.पेव्हर जाताहेत चोरीलाबीएसएनएलचे केबल गुरुवारी खोदकामादरम्यान तुटल्यानंतरही विभागाने मजीप्रावर कुठलीही कारवाई केली नाही. मजीप्राने नवीन पाइप लाइन टाकताना जुने पाइप काढले नाही. कारण त्यासाठी अतिरिक्त निधी खर्च करावा लागणार आहे. खोदकाम अतिरिक्त खोल करण्यात येत असल्याने इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे.पाइप लाइन टाकण्याचे कंत्राट नाशिक येथील एका कंत्राटदाराला मिळाले आहे. हे काम होत असताना मनपा किंवा मजीप्राचा कुठलाही अभियंता या ठिकाणी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, काढलेले पेव्हर चोरीला गेल्याची माहिती आहे. यासंदर्भात मजीप्रा कार्यकारी अभियंता कोपुलवार यांच्याशी संपर्क साधला; पण होऊ शकला नाही.अमृत योजनेच्या ११४ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामात गाडगेनगरातही शनिवारी काँक्रीट रस्ते फोडण्यात आले. येथे महिन्याभरापूर्वीच पेव्हर बसविण्यात आले होते.उपअभियंत्यांना पाठवून कामाची पाहणी करणाररस्त्याच्या मधोमध खोदून पाइप लाइन टाकणे हे नियमबाह्य आहे. यासंदर्भात मनपाच्या उपअभियंत्याना पाठवून कामाची पाहणी करणार असल्याचे मत अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. या संदर्भात १४ फेब्रुवारी रोजी महापालिकेत मजीप्रा अधिकाºयांची एक बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ब्रेकिंग मशीनचा आवाज झाला बंदशनिवारी या परिसरात खोदकाम करण्याचे काम कंत्राटदारांनी बंद ठेवल्याची माहिती या प्रभागातील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे ब्रेकिंग मशीनच्या कर्कश्श आवाजापासून नागरिकांना काही प्रमाणात सुटका मिळाली आहे.मधोमध रस्ता फोडून कसे काय काम करण्यात येत आहे, हे मलाही समजले नाही. याची पाहणी करून चौकशी करण्यात येईल.- जीवन सदार,अतिरिक्त शहर अभियंताअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ... : सदर कामे करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने महापालिकेशी करार केला आहे. त्यानुसार मजीप्राला तातडीने पूर्ववत करून द्यावा लागणार आहे. परंतु, या ठिकाणी पाइप लाइन टाकल्यानंतर खोदकाम महिन्याभरापासून पूर्ववत करण्यात आलेले नाही व रस्तेही समतल करण्यात आले नाहीत. या ठिकाणी पसरलेली माती उचलून घ्यावी व फोडण्यात आलेले पेव्हर पूर्ववत करावे, अशी मागणी विनायकनगरातील नागरिकांनी केली आहे.