शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

निराधारांचे अनुदान काढणारे दलाल सक्रिय

By admin | Updated: May 17, 2014 23:14 IST

निराधार, वृध्दांना आधार मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे या योजना लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

चांदूरबाजार : निराधार, वृध्दांना आधार मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, चुकीच्या  नियोजनामुळे या योजना  लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. लाभार्थ्यांंना थेट अनुदान मिळावे म्हणून शासनाने  निराधार योजनांची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण अवलंबिले. आता निरक्षर व निराधार  वृध्दांना त्यांच्या अनुदानाची रक्कम बँकेतून काढून देण्यासाठी पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बँक  परिसरात  यासाठी दलाल सक्रिय झाल्याचे चित्र आहे.  
यावर आळा घालण्यासाठी प्रशासन अथवा बँक प्रशासनातर्फे अद्यापपर्यंंत पावले उचलल्या न गेल्यामुळे लाभार्थी  नाडवला जात आहे. शासनामार्फत महिला, वृध्द, निराधार, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासारख्या अनेक  योजनांच्या माध्यमातून वृद्ध व निराधारांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. ही मदत दर दोन किंवा तीन  महिन्यांनंतर संबंधित लाभार्थ्यांंच्या बँक खात्यात महसूल प्रशासनामार्फत जमा केली जाते. एका लाभार्थ्यांंला दर तीन  महिन्यांनंतर ६00 ते १२00 रुपये प्राप्त होतात. ही रक्कम काढण्यासाठी लाभार्थी शेकडोंच्या संख्येत बँकेत  जातात. यात बहुतेक लाभार्थी वृध्द व निरक्षर असतात. नेमका याच बाबीचा फायदा घेऊन बँक परिसरात दलाल  सक्रिय झाले आहे. या मोबदल्यात हे दलाल संबंधित लाभार्थ्यांंकडून १0 ते ५0 रुपयांपर्यंंत रक्कम उकळतात.  इतकेच नव्हे तर पैसे देण्यास नकार देणार्‍या लाभार्थ्यांंना पैसे मिळविण्यात अडचणी आणतात. अनुदान बंद  होण्याची भीती दाखवितात. त्यामुळे नाईलाजाने का होईना लाभार्थ्यांंना नाहक भुर्दंंड सहन करावा लागत आहे.
 राष्ट्रीयीकृत बँका तालुकास्थळी असल्याने येथे शिरजगाव बंड, जैनपूर, जवळा, आखतवाडा, वडाळा, हैदतपूर,  जसापूर, कुरळ सोनोरी, नानोरी, खराळा,खरवाडी आदी गावखेड्यातील विविध अनुदान योजनेचे वृध्द व निराधार  लाभार्थी येथे येतात. त्यांना ४0 ते ५0 रुपये प्रवास भाडे द्यावा लागतो. बँकेत पैसे मिळण्यासाठी अख्खा दिवस  जातो. काहींना विलंबाअभावी रिकाम्या हाती परतावे लागले. 
इतकेच नव्हे तर बँकेतही वशिलेबाजीचा सामना लाभार्थ्यांंना करावा लागतो. तसेच बँकेतही या लाभार्थ्यांंना कुणाची  मदत मिळत नसल्याने दलालांचे सहकार्य घ्यावे लागत आहे. सहकार्य करायचे म्हटले की, दलालांना पैसे द्यावेच  लागतात. त्यामुळे मिळालेल्या अनुदानालाही कात्री लागते याची दखल कोण घेणे गरजेचे आहे. (तालुका  प्रतिनिधी)