शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री-जातीचा अपमान करणाऱ्या अपशब्दांवर कायदेशीर बंदी आणा, पत्रकार परिषदेत मागणी

By उज्वल भालेकर | Updated: July 8, 2024 22:33 IST

शिव्यामुक्त समाज अभियान समितीने आज अमरावतीत घेतली पत्र परिषद

उज्वल भालेकर, अमरावती: आपल्या देशात एकीकडे आपण मातृत्व दिन, रक्षाबंधन, भाऊबीज, महिला दिन साजरा करतो. तर दुसरीकडे त्याच आई आणि बहिणींशी निगडित स्त्रीजातीचा अपमान होईल अशा अपशब्दांचा व अश्लाघ्य शिव्यांचा वापरदेखील आपण करतो. भांडण पुरुषांचे असले तरी त्यामध्ये स्त्रियांचाच अपमान केला जातो. आपल्या आई, बहिणीच्या सन्मानासाठी अशा अपशब्दांवर कायदेशीर बंदी आणणे गरजेचे असल्याची मागणी शिव्यामुक्त समाज अभियान समितीच्या वतीने सोमवारी पत्र परिषदेत करण्यात आली. या बरोबरच शाळा, महाविद्यालयातून शिव्यामुक्त अभियान राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील यावेळी सांगण्यात आले.

आपल्या देश हा विविधतेने नटलेला अशा समृद्ध संस्कृतीची भूमी आहे. येथे सर्वच धर्म, संप्रदायात स्त्रियांचा आदर करण्याची मूल्ये सांगतात. स्त्रियांना देवीचे रूप देऊन त्यांची स्तुती तसेच पूजाही आपल्या देशात होते. परंतु दुसरीकडे पुरुषत्व दाखविण्यासाठी शिवीगाळ करताना मात्र त्यात स्त्रीजातीचा अपमान होईल असेच अश्लाघ्य शब्द वापरले जातात. आणि हे स्त्री आणि तिचे शरीर हे आपल्या मालकीचे आहे हे पुरुष मानसिकता दर्शवणारे आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज व चित्रपटांमध्येदेखील अशा शिव्यांचा व अश्लील हिंसक दृश्यांचा सर्रासपणे वापर केला जात असून हे सामाजिक मूल्यांशी सुसंगत नाही. त्यामुळे यावर वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. त्यामुळे स्त्रियांच्यासंदर्भातील अश्लाघ्य शिवीगाळ थांबविण्यासाठी कठोर कायदा करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये लिंगभाव समानता, माता-भगिनींचा सन्मान आदी बाबींचा समावेश करणे, ओटीटी प्लॅटफॉर्मवील चित्रपटात शिव्यांचा वापर करणाऱ्या लेखक. कलाकार, निर्देशक यांच्यावरही कारवाई व्हावी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून स्त्रीजातीचा अपमान करणार नाही अशा प्रकारचे प्रतिज्ञा पत्र लिहून घ्यावे अशा विविध मागण्या शिव्यामुक्त समाज अभियान समितीने केल्या आहेत. यावेळी डॉ. अंबादास मोहिते, पंडित पंडागळे, रजिया सुलतान, शीतल मेटकर, संजय देशमुख, भगवान फाळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती