अमरावती : स्थानिक रुरल कॉलनीत शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी वसाहतीत शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची पुण्यतिथी साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल वानखडे, विशाल अढाऊ, राजेश भटकर, प्रियंका अढाऊ, भरत काळमेघ, माया भटकर व अन्य नागरिक उपस्थित होते.
..................................
कठोरा येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ
अमरावती : आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कठोरा बु. येथे नुकताच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राचा शुभारंभ पं.स. उपसभापती रोशनी अळसपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच मंगेश महल्ले, उपसरपंच संगीता भालेराव, प्रवीण अळसपुरे, विनोद भालेराव व ग्रावकरी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
...........................................
बाजार समितीत गव्हाची आवक
अमरावती : सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे नवीन गव्हाचे उत्पादन येत आहे. त्यामुळे शेतकरी आपली आर्थिक कामे भागविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन गहू विक्रीस आणत आहेत.
............................
अर्थ विषय समिती सभेची तयारी
अमरावती : जिल्हा परिषद अर्थ विषयक समितीची सभा पुढील आठवड्यात होऊ घातली आहे. सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या मासिक सभेसाठी वित्त विभागाने तयारी सुरू केली आहे.
....................
चौसाळा ते चिंचोना रस्ता उखडला
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चाैसाळा ते चिंचोना रस्ता उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.