अमरावती : ग्रामीण भागात सध्या गहू काढणीच्या कामाला वेग आला आहे. गत काही दिवसांपासून गहू कापणीसोबतच काढणीच्या कामात शेतकरीवर्ग व्यक्त आहे.
.....................................................
हिरापूर ते निमखेड रस्ता उखडला
अंजनगाव सुजी : तालुक्यातील हिरापूर ते निमखेड बाजार गावाकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. परिणामी नागरिकांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
..............................................................
...अखेर त्या रस्त्याचे डांबरीकरण
अमरावती : स्थानिक भातकुली पंचायत समितीमधील डांबरी रस्ता गत काही दिवसांपासून उखडला होता. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय लक्षात घेता अखेर या रस्त्याचे डांबरीकरण करणयात आले आहे.
.....................................
घरकुलासाठी विटांची मागणी वाढली
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सध्या ग्रामीण भागात घरकुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे विटा, रेती, सिमेंट, लोखंड आदी साहित्याची मागणी वाढली आहे. मात्र, वाळू आणि विटा वेळेवर उपब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांना कसरत होत आहे.
...............................................
ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ