शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर समाजकल्याण निरीक्षक अटकेत

By admin | Updated: August 23, 2016 00:52 IST

सामूहिक विवाह सोहळ्याचे अनुदान देण्याकरिता पाच हजारांची लाच मागणाऱ्या समाजकल्याण

अमरावती : सामूहिक विवाह सोहळ्याचे अनुदान देण्याकरिता पाच हजारांची लाच मागणाऱ्या समाजकल्याण निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. प्राजक्ता दत्तात्रय सोनुने (३४,रा. स्वावलंबी नगर, कठोरा रोड) असे आरोपीचे नाव आहे. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेमार्फत २६ आॅगस्ट २०१२ रोजी ऋणमोचन येथील मुदगलेश्वर महाराज देवस्थानात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहभागी प्रत्येक जोडप्यामागे संस्थेला शासनाकडून दोन हजार रुपये अनुदान मिळणार होते. अनुदान मिळण्यासाठी संस्थाध्यक्ष भगवंत काळे यांनी विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी संस्थेला २० हजारांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र, उर्वरित अनुदानाचा धनादेश काढण्यासाठी समाज कल्याण निरीक्षक प्राजक्ता सोनुने यांनी संस्था अध्यक्षाला पाच हजारांची लाच मागितली. याबाबत संस्थाध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार सोमवारी एसीबीच्या पथकाने समाज कल्याण कार्यालयात सापळा रचून तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली. त्यामध्ये आरोपी प्राजक्ता सोनुने यांनी पाच हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तिला पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक एम.डी. चिमटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, घटक प्रमुख आर.बी.मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, राजवंत आठवले, जिवन भातकुले, पुजा खांडेकर, पोलीस हवालदार विनोद दाभणे, पोलीस नाईक विक्रम ठाकूर, आशिष इंगोले, सैय्यद ताहेर आली, ज्योती झाडे, चालक शैलेश कडू व अकबर यांचा समावेश आहे. अशाप्रकारच्या भष्ट्राचाराविषयी माहिती मिळाल्यास अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरो कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)