शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर कनिष्ठ सहायक अटकेत

By admin | Updated: November 9, 2016 00:18 IST

प्रलंबित वेतनाचे बिल काढून देणाऱ्या कनिष्ठ सहायकास दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.

दोन हजारांची लाच : कावली दवाखान्यातील घटनाधामणगाव रेल्वे : प्रलंबित वेतनाचे बिल काढून देणाऱ्या कनिष्ठ सहायकास दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. प्रमोद नामदेव डाफ (५०,रा. कृष्णा कॉलनी, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारकर्ता हे धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अ‍ॅलोपॅथी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनाचे देयक कनिष्ठ सहायक प्रमोद डाफ यांच्याकडे होते. देयके तयार करून ‘आॅनलाईन फॉरवर्ड’ करण्याचे काम ते करीत होते. ६ आॅक्टोबरला केली होेती तक्रार अमरावती : तक्रारकर्त्याचे आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्याचे प्रलंबित बिल आरोपी प्रमोद डाफ यांनी तयार करून पंचायत समितीकडून मंजूर करून घेतले. त्यानंतर वेतनाची रक्कम तक्रारकर्त्याच्या बँक खात्यात जमा झाली. मात्र, वेतनाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तक्रारकर्त्यास दोन हजारांची लाच मागितली. याबाबत ६ आॅक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी प्रमोदने तक्रारदाराला लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ८ नोव्हेंबर रोजी सापळा रचला असता आरोपी प्रमोद अ‍ॅलोपॅथी दवाखान्यात तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना आढळून आला. त्यावेळी एसीबी पथकाने आरोपीला रंगेहात पकडले. पोलीस अधीक्षक महेश चिमटे व अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल शिरे, ज्ञानेश्वर उराडे, राहुल तसरे तसेच हवालदार श्रीकृष्ण तालन, पुरूषोत्तम बारड, शिपाई प्रमोद धानोरकर, चालक पोलीस नाईक, अकबर खान यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणचा अधिक तपास एसीबी करीत आहे. (प्रतिनिधी)