शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत विभाग पाचव्या क्रमांकावर

By admin | Updated: January 10, 2016 00:25 IST

राज्यात मागील दोन वर्षांत लाचखोरांची संख्या वाढली आहे. ‘अडत्यां’ची आर्थिक मुस्कटदाबी करून स्वत:चे उखळ पांढरे ...

पुण्याचे अढळस्थान कायम : जनजागृतीने तक्रारीही वाढल्याअमरावती : राज्यात मागील दोन वर्षांत लाचखोरांची संख्या वाढली आहे. ‘अडत्यां’ची आर्थिक मुस्कटदाबी करून स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्यांमध्ये अमरावती विभागाने पाचवा क्रमांक पटकावला आहे. गेल्या २ वर्षांत लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये पुणे विभाग अव्वल आहे. त्यापाठोपाठ नाशिक आणि औरंगाबादचा क्रमांक लागतो. अधिकारी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींच्या भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी राज्यात अमरावतीसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, ठाणे, नांदेड आणि मुुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी अमरावतीसह अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलडाणा जिल्हा संलग्न आहे. पोलीस अधीक्षक महेश चिमटे यांच्या नेतृत्वात सन २०१५ मध्ये १३८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. तक्रारीनंतर यशस्वी होणाऱ्या सापळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात तक्रारकर्ते समोर येत आहेत. मागील दोन वर्षांत तब्बल २,५८६ लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. मात्र भ्रष्ट्राचार वा लाचखोरीला आळा असलेला नाही. अजुनही ‘बिदागी’ दिल्याशिवाय फाईल हलत नाही. साध्या कोतवालापासून थेट उच्चाधिकारी ‘एसीबी’च्या सापळ्यात अडकल्याने लाचखोरीचे पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा प्रत्यय येतो. लाच मागितल्याच्या तक्रारीची शहानिशा करून ‘एसीबी’ सापळे रचते. भ्रष्टाचार वा लाचखोरीला पायबंद घालण्यासाठी हा प्रयत्न होतो. तथापि प्रत्यक्षात गत दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे दिसत आहे. त्याअनुषंगाने जनजागृतीची गरज आहे. (प्रतिनिधी)