शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कारागृहांत कैद्यांच्या भेटीला ‘ब्रेक’; दोन आठवडे तात्पुरत्या कारागृहात बंदीजनांचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 18:40 IST

कोरोना इफेक्ट

- गणेश वासनिक

अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कारागृहांत कैद्यांच्या नातेवाईकांसोबतच्या भेटीला तूर्त मनाई आहे. आठवड्यातून एक दिवस व्हिडीओ कॉलींगद्वारे कैद्यांना आप्त स्वकीयांसोबत संवाद साधण्याची हल्ली सुविधा आहे. अगोदर कैद्यांना कारागृहात इंटरकॉम प्रणालीद्वारे नातेवाईकांसोबत आमने-सामने संवाद साधता येत होता. परंतु, कोरोनामुळे राज्यभरातील कैद्यांना नातेवाईकांसोबतच्या भेटीला लगाम लावण्यात आला आहे.

मुंबई येथील ऑर्थर रोड, पुणे येथील येरवडा, नागपूर व अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात कर्मचारी व बंदीजन हे कोरोना संक्र मित आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा हादरून गेली होती. गृह विभागाच्या आदेशानुसार मे महिन्यापासूनच कारागृहात कैद्यांची नातेवाईकांसोबतच्या भेटीला ‘ब्रेक’ लावण्यात आला. नागपूर येथे जुलै, तर अमरावती मध्यवर्ती कारागृहात ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा कैदी संक्रमित आढळून आले.

गृह विभागाच्या नव्या गाईडलाईननुसार नवीन कैद्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कारागृह साकारण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात पाठविल्या जाणाऱ्या कैद्यांना अगोदर दोन आठवडे तेथे मुक्काम अनिवार्य आहे. कोरोना चाचणी, अहवाल, डॉक्टरांकडून तपासणी आदी पूतर्तेनंतरच बंदीजनांना जुने कारागृहात ठेवण्यात येते. राज्यात ९ मध्यवर्ती कारागृह, ११ खुले कारागृह, ४७ जिल्हा कारागृह वर्ग १ व २ आणि दोन महिला कारागृहांत कैद्यांच्या नातेवाईकांसोबतच्या भेटीला मनाई आहे.व्हिडीओ कॉलींगची सुविधा

कोरोनामुळे तूर्तास कैद्यांची नातेवाईकांसोबतची भेट, संवाद बंद आहे. तथापि, कैद्यांच्या मागणीनुसार आठवड्यातून एकदा व्हिडीओ कॉलींगद्वारे नातेवाईकांसोबत संवाद साधता येणार आहे. तशी सुविधा कारागृह प्रशासनाने केली आहे. त्याकरिता निरीक्षक नेमण्यात आले असून, कैद्यांना सोयीनुसार त्यांच्या नातेवाईकांसोबत व्हिडीओ कॉलींगद्वारे संवाद साधता येत आहे. ही सुविधा तात्पुरत्या व जुने कारागृहात उपलब्ध आहे.कैद्यांची दोनदा कोरोना चाचणी

न्यायालयाच्या आदेशान्वये कारागृहात येणाºया कैद्यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तात्पुरत्या कारागृहात कैद्यांची कोरोना चाचणी होते. येथे दोन आठवडे मुक्कामानंतर पुन्हा अँटिजेन चाचणी केली जाते. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जुने कारागृहात सदर कैदी पाठविले जातात, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली आहे. बंदीजनांच्या नातेवाईकांसोबतच्या इंटरकॉम भेटीला राज्यभरातील कारागृहांमध्ये मनाई आहे. तसे गृहविभागाचे आदेश आहेत. मात्र, रोटेशन प्रणालीनुसार कैद्यांना आठवड्यातून एकदा व्हिडीओ कॉलिंगद्वारे नातेवाईकांसोबत संवाद साधता येत आहे.- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.

टॅग्स :jailतुरुंग