शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाकर गेली अन् नुडल्स आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:12 IST

मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.

ठळक मुद्देकवी विठ्ठल वाघ यांची मिश्कील टीका : मराठी भाषा दिन थाटात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, मराठी विभागप्रमुख मनोज तायडे, हेमंत खडके आदी उपस्थित होते.विठ्ठल वाघ म्हणाले, मराठी भाषेला इतिहास, गौरव आहे. मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण केले. परंतु, आता मराठी भाषेची भेसळ झाली. अलीकडे मराठी माणूस भाषेचे पोषाख परिधान करीत नाही. भाषा बोलत नाही. खानपान बदलले. मराठी भाषा बोलणे अपमानजनक वाटते. त्यामुळे संस्कृतीचा गळा घोटण्याची प्रक्रिया सुरू झाली. घरी वाढदिवस, उत्सवाचे प्रसंग असले की, आता भाकर मिळत नाही. नुडल्सने ती जागा घेतली. त्यामुळे संस्कृती टिकवायची असेल, तर मराठी भाषा बोलली पाहिजे. माय आणि मम्मी यातील फरक समजून घ्या. मुंबई, पुण्याकडेच केव्हाचीच मराठी भाषा संपली. खेड्यातील माणूस निरक्षर, अशिक्षित असल्यामुळेच मराठी भाषा जिवंत असल्याचा दावा वाघ यांनी केला.‘माझ्या मायमराठीचा मला जिवापार छंद’, ‘बैलातील चैतन्याशी तिफण जोडते नाते’, ‘हिरवं लुगडं नेसली लाल बांगड्या हातात’, ‘पारंबी होजो लेका वडाले देजो टेका’ अशा सरस कवितांचे सादरीकरण करून त्यांनी मराठी भाषा संवर्धन, जतन करण्याचे आवाहन केले. यावेळी २७ प्रादेशिक बोलींच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख, संचालन हेमंत खडके यांनी केले.तत्पूर्वी, दुपारी ३ वाजता शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून दिंडी काढण्यात आली. पारंपरिक परिधान करून मुलेमुली यामध्ये सहभागी झाली होती. ही दिंडी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात वाजतगाजत नेण्यात आली.