शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर देणार स्वच्छतेचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:39 IST

महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ चे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर भारत गणेशपुरे बुधवारी अमरावतीकरांना स्वच्छतेचा कानमंत्र देणार आहेत.

ठळक मुद्देटाऊन हॉलमध्ये आज आयोजन : महापालिकेत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ची पूर्वतयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ चे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर भारत गणेशपुरे बुधवारी अमरावतीकरांना स्वच्छतेचा कानमंत्र देणार आहेत. खासगी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने राज्याच्या घराघरांत पोहचलेले अमरावतीकर भारत गणेशपुरे यांची महापालिकेने ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. त्यांच्या उपस्थितीत बुधवार २५ आॅक्टोबरला टाऊन हॉल येथे स्वच्छतेच्या अनुषंगाने महापालिकेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.जानेवारी २०१८ मध्ये अमरावती शहराला ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१८’ या केंद्रस्तरावरील ‘स्वच्छ शहर ’स्पर्धेला सामोरे जायचे आहे. यंदा झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात शहर २३३ क्रमांकापर्यंत घसरले होते. ती नामुष्की शहरावर पुन्हा येऊ नये, यासाठी महापालिकेने ‘स्वच्छ अमरावती’चा संकल्प सोडला आहे. अल्प मनुष्यबळ आणि मर्यादित साधनसामग्रीमुळे महापालिकेच्या प्रयत्नांना मर्यादा आली आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेला लोकसहभागाचे बळ आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमिवर अमरावतीकर जनतेला आपलेसा वाटणारा चेहरा भारत गणेशपुरे यांच्या रुपाने महापालिकेने शोधला आहे. गणेशपुरे यांनी महापालिकेचा प्रस्ताव स्वीकारला असून ते बुधवारी दुपारी ४ वाजच्याच्या सुमारास शहर स्वच्छतेबाबत अमरावतीकरांशी संवाद साधणार आहेत.घनकचरा व्यवस्थापन, विलगीकरण, प्लास्टिकबंदी व स्वच्छताविषयक उपक्रमातील जनजागृती मोहिमेत गणेशपुरे यांची छवी वापरली जाणार आहे.देशातील ५०० शहरांतून स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक पटकावणाºया इंदोर शहराने त्यांच्या यशाचे संपूर्ण गमक जागरूक लोकसहभागात असल्याचे पुरस्कार स्वीकारताना म्हटले होते. लोकसहभागाचा तोच कित्ता अमरावती महापालिका गिरवणार आहे. गणेशपुरेही त्या मोहिमेत सक्रिय राहतील. शहर स्वच्छतेत लोकसहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे.स्वच्छ सर्वेक्षण दिंडी२५ आॅक्टोबरला दुपारी दिडच्या सुमारास गणेशपुरे महापालिका सभागृहात पदाधिकारी व अधिकाºयांशी संवाद साधतिल. त्यानंतर दुपारी ३.४५ च्या सुमारास स्वच्छ सर्वेक्षण दिंडी काढली जाणार आहे. दुपारी ४ वाजता होणाºया मुख्य कार्यक्रमाला सेंद्रिय शेतीचे संशोधक सुभाष पाळेकर यांच्यासह स्थानिक आमदार ,महापालिकेचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचत गट, एमआयडीसी असोशिएशन, आयएमए , स्त्री वैद्यकीय संघटना , लॉयन्स क्लबच्या प्रतिनिधींसह हॉटेल्स, मंगल कार्यालयधारकांना निमंत्रित करण्यात आले आहे.