शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात आचार्य पदवी प्रमाणपत्राचे शाखानिहाय होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रमाणपत्राचे शाखानिहाय नियोजन केले आहे. १६ ते १९ जूनदरम्यान विद्यापीठात पीएच. ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रमाणपत्राचे शाखानिहाय नियोजन केले आहे. १६ ते १९ जूनदरम्यान विद्यापीठात पीएच. डी. प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार असून, पदवीकांक्षींना पत्राद्धारे कळविले आहे.

विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी आभासी पद्धतीने पार पडला. या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्‌य सामंत यांची उपस्थिती होती. आता विद्यापीठाने आचार्य पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी नियोजन केले आहे. आचार्य पदवीकांक्षीना ओळखपत्र व पदवी शुल्क भरल्याची पावती सोबत आणावी लागेल. आचार्य पदवी शुल्क २०० रुपये विद्यापीठात जमा करणे आवश्यक असणार आहे. आचार्य पदवी प्रमाणपत्रात काही त्रुटी असल्यास त्याबाबत कार्यालयीन वेळेत विद्यापीठ परीक्षा विभागातील सहाय्यक कुलसचिव (सारणी) यांच्याशी संपर्क साधवा लागेल. प्रतिनिधीमार्फत पदवी हस्तांतरीत करावयाची असल्यास अधिकार सहपत्र व ओळखपत्रासह प्रतिनिधींना हजर राहावे लागणार आहे. आचार्य पदवी प्रमाणपत्राचे वितरण विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन केंद्र, परीक्षा विभागात करण्यात येणार आहे.

---------------

असे होईल आचार्य पदवी वितरण

- विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा : १६ जून, दुपारी १२ ते ४

- मानव्य विज्ञान विद्या शाखा : १७ जून, दुपारी १२ ते ४

- वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा: १८ जून, दुपारी १२ ते ४

-आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा : १९ जून, दुपारी १२ ते ४

-------------------

आचार्य पदवीकांक्षींना वितरणाबाबत कळविण्यात आले आहे. केंद्रीय मूल्यांकन विभागात ओळखपत्र, पदवीचे २०० रुपये शुल्क भरल्याची पावती पीएच .डी. पदवीधारकांना सोबत आणावी लागणार आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ