शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा येथील शाखा अभियंता निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:46 IST

मेळघाटात वादग्रस्त ठरलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात दरसूचीप्रमाणे अंदाजपत्रके तयार न करताही त्यास तांत्रिक मान्यता दिल्याच्या कारणावरून येथील पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक राठोड यांना बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी निलंबित केले. यात आणखी काही जणांवर कारवाई केली जाणार असल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमेळघाटातील मग्रारोहयो कामांत अनियमितता : आयुक्तांचा आदेश, सीईओंची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटात वादग्रस्त ठरलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात दरसूचीप्रमाणे अंदाजपत्रके तयार न करताही त्यास तांत्रिक मान्यता दिल्याच्या कारणावरून येथील पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक राठोड यांना बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी निलंबित केले. यात आणखी काही जणांवर कारवाई केली जाणार असल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.मेळघाटात मग्रारोहयो अंतर्गत केलेल्या कोट्यवधीच्या कामांपैकी चिखलदरा तालुक्यातील सर्व ४७ कामांची तपासणी अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्ह्यांतील अभियंत्यांकडून दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली. ही तपासणी जिल्ह्यातील विविध यंत्रणेमार्फत पाचव्यांदा करण्यात आली होती, हे विशेष.तपासणी अहवाल समितीने विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याकडे संबंधित अभियंत्यांनी सोपविला होता. त्यामध्ये मग्रारोहयोच्या अंदाजपत्रकात रोजगार हमी योजनेचे निकष व नियमानुसार दरसूचीनेप्रमाणे अंदाजपत्रके तयार केली नसतानाही तांत्रिक मान्यता दिली असल्याचा ठपका शाखा अभियंता विवेक राठोड यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी तात्काळ निलंबित केले. इतरांविरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.धारणी तालुक्यात चौकशी नाहीधारणी तालुक्यात मग्रारोहयोची कोट्यवधीची कामे बड्या राजकारण्यांनी केल्याचे सत्य आहे. मात्र, तेथे कुठल्याच प्रकारची चौकशी समितीने केली नाही. दुसरीकडे चिखलदरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मग्रारोहयोच्या कामावर साहित्यपुरवठा केला. त्यांची देयकेसुद्धा अजूनपर्यंत काढण्यात आली नाहीत. यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मग्रारोहयोच्या नियमानुसार कामे न केल्याचा अहवाल चौकशी समितीने दिल्यानंतर शाखा अभियंता विवेक राठोड यांना निलंबित करण्यात आले. संबंधितांवरसुद्धा कारवाई करण्यात येईल.- मनीषा खत्री, सीईओजिल्हा परिषद, अमरावती