शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छत्री तलाव परिसर सौंदर्यीकरणास ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:35 IST

महापालिका क्षेत्रातील छत्री तलाव परिसराचे सौंदर्यीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाने सिमेंट काँक्रीटीकरण जोरात सुरू असून, हा प्रकार जैवविविधतेला धोका निर्माण करणारा असल्याची तक्रार पोहरा जंगल बचाव समितीने केली होती. त्यानुसार मंगळवारी महापालिका, वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासकांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकाँक्रिटीकरणास नकार : महापालिका, वनविभाग, वन्यजीव अभ्यासकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रातील छत्री तलाव परिसराचे सौंदर्यीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाने सिमेंट काँक्रीटीकरण जोरात सुरू असून, हा प्रकार जैवविविधतेला धोका निर्माण करणारा असल्याची तक्रार पोहरा जंगल बचाव समितीने केली होती. त्यानुसार मंगळवारी महापालिका, वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासकांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे.पोहरा जंगल बचाव समितीचे नीलेश कंचनपुरे यांनी १३ जून २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्री तलाव परिसराचे विकासकामांच्या नावे जोरात सिमेंट काँक्रीटीकरण होत असल्याची तक्रार दिली होती. या कामांमुळे जंगलातील जैवविविधता संपुष्टात येऊन वन्यजिवांना तृष्णा भागविण्यासाठी पाणी मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. १०० कोटी रुपयांच्या निधीतून छत्रीतलाव परिसराचे सौदर्यीकरण होत असले तरी वन्यक्षेत्र बाधित होणार असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, महापालिका शहर अभियंता पवार, अनंत पोतदार, प्रमोद कुळकर्णी, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर, नीलेश कंचनपुरे, वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे, जयंत वडतकर, सागर मैदानकर, अभिजित कडू, नीलेश करवाडे, वनपाल घागरे आदींनी छत्री तलाव परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचीपाहणी केली. भविष्यात ही विकास कामे जंगल, वन्यजीवांसाठी धोकादायक असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला गेला.महापालिका प्रशासन ही कामे करीत आहे. त्याबाबत त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.- गजेंद्र नरवणेउपवनसंरक्षक, अमरावती.