शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांनी रचला मुलगा पळून गेल्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:07 IST

शिक्षकाने रागावल्याने आपला मुलगा घरून पळून गेला आहे, तशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. यामुळे पोलिसांनी शिक्षकावर कारवाई करावी, अशी तक्रार अचलपूर ठाण्यात दाखल झाली.

ठळक मुद्देपालकासह शिक्षकावर गुन्हे दाखल

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : शिक्षकाने रागावल्याने आपला मुलगा घरून पळून गेला आहे, तशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. यामुळे पोलिसांनी शिक्षकावर कारवाई करावी, अशी तक्रार अचलपूर ठाण्यात दाखल झाली. मात्र तीन तासांतच मुलगा पळाला नसून आई-वडिलांनीच हा डाव आखल्याचे लक्षात येताच हे प्रकरण पालकांच्या आंगलट आले. ही घटना शनिवारी उघडकीस आली.डोके सुन्न करणारी ही घटना अचलपूर शहरातील चावलमंडी परिसरातील आहे. आपला मुलगा शाळेतील शिक्षकाने रागावल्यामुळे घरून निघून गेल्याची फिर्याद शारदा संजय शर्मा (४०) यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दिली. तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा प्रेम (१४) येथील राष्ट्रीय शाळेत इयत्ता नववीत आहे. त्यास शिक्षक चेतन शर्मा यांनी थापड लगावल्याने तो घरून निघून गेला व जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दिली आहे, असे नमूद होते.सदर प्रकरण गंभीर असल्याचे पाहून ठाणेदार आधारसिंग सोनुने यांनी सर्व पोलीस यंत्रणा कामाला लावली. मात्र काहीच हाती लागले नाही. लगेच त्याचे मित्राकडे शोधमोहीम चालविली. यातच प्रेम त्याच्या मावशीकडे मूर्तिजापूर येथे असल्याचे समजले. पोलिसांचे एक पथक मूर्तिजापूर येथे पोहोचले, रात्री ११ वाजताच्या सुमारास प्रेमला ताब्यात घेऊन अचलपुरात आणण्यात आले.शिकवणी शिक्षकाचा सहभागप्रेमने पोलिसांना दिलेले बयाण संतापजनक आहे. शाळेतील शिक्षक चेतन शर्मा यांना धडा शिकविण्यासाठीच आई-वडील व शिकवणी वर्गाचे शिक्षक आशिष जोशी (रा. सुल्तानपुरा) यांनी त्यास खोटी चिठ्ठी लिहायला लावली. त्यानंतर मूर्तिजापूर येथे पाठविले. यामुळे पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला व या प्रकरणाची सत्यता समोर आली.तक्रार अंगलट आलीप्रेमचे आई-वडील व शिकवणी वर्गाचे आशिष शर्मा यांचा डाव त्यांच्यावरच उलटला व भादंविच्या कलम १७७ अन्वये त्यांच्यावरच गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. अचलपूरचे ठाणेदार आधारसिंग सोनुने यांनी प्रकरण तडीस नेले. तपास ठाणेदारांसह जमादार विनोद राऊत, पुरुषोत्तम बावनेर, रवी बावणे, मीनाक्षी इंगोले यांनी केला.हे प्रकरण तक्रारीच्या वेळी अतिशय गंभीर होते. शिक्षकांच्या आपसी भांडणातून पोलिसांना खोटी माहिती देण्यासाठी मुलाचा वापर केला. विनाकारण त्रास देणाºयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- आधारसिंग सोनुने,ठाणेदार, अचलपूर