शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेशुद्धावस्थेत सापडलेला बालक निघाला बल्लारशाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:18 IST

चांदूर रेल्वे येथे रेल्वे रुळावर बुधवारी बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या चार वर्षीय बालक बल्लारशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात व्हायरल झालेल्या संदेशामुळे त्या बालकाची ओळख पटली आणि गुरुवारी त्याचे कुटुंबीय अमरावतीत पोहोचले.

ठळक मुद्देचांदूर रेल्वेतील घटना : ओळख पटली, आयूष रोहिदासला मिळाले आई-वडील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर रेल्वे येथे रेल्वे रुळावर बुधवारी बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या चार वर्षीय बालक बल्लारशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात व्हायरल झालेल्या संदेशामुळे त्या बालकाची ओळख पटली आणि गुरुवारी त्याचे कुटुंबीय अमरावतीत पोहोचले. आयुष अनिल रोहिदास (४, रा. बल्लारशा) असे त्या बालकाचे नाव आहे.चांदूर रेल्वे येथील रेल्वे स्थानकावर आढळून आलेल्या चार वर्षीय चिमुकल्याला जीआरपी पोलिसांनी इर्विन रुग्णालयात दाखल केले. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. सुनील देशमुख यांनीही विविध स्तरावर प्रयत्न केले. दरम्यान, एका कुटुंबीयांनी बल्लारशा पोलिसांकडे बालक बेपत्ता असल्यासंदर्भात धाव घेतली. पोलिसांनी कुटुंबीयांना जखमी बालकाचे छायाचित्र दाखविताच ओळख पटली. ओळख पटताच त्याच्या कुटुंबीयांनी तत्काळ अमरावतीकडे धाव घेतली. दोन दिवसांनंतर कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल असलेला आयुष दिसताच त्यांचे अश्रू अनावर झाले. तथापि, पोलिसांनी आयुष रेल्वे स्थानकावर कसा पडला, याबाबत माहिती विचारली असता, त्याचा घटनाक्रम न पटण्यासारखाच होता. आयुषचे मोठे वडील अशोक रोहिदास १ मे रोजी आयुष व त्यांचा मुलगा आझादला फिरायला घेऊन गेले. त्यानंतर ते रेल्वे स्थानकावर पोहोचले. डोंगरगड जाण्याचा बेत आखून ते बम्बलेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यांना तेथून बल्लारशाला परत यायचे होते, मात्र, रेल्वे गाडी नसल्यामुळे ते स्थानकावरच झोपले. २ मे रोजी अशोक हे दोन्ही मुलांना घेऊन एका रेल्वेत बसले. चांदूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर आपण चुकीच्या रेल्वेत बसल्याचे त्यांना समजले. ते रेल्वेतून आली उतरले आणि बल्लारशा रेल्वेची प्रतीक्षा करू लागले. काही तासानंतर बल्लारशा जाणारी रेल्वे आली. अशोक रोहिदास दोन्ही मुलांना घेऊन चढत असताना आयुष खाली पडला आणि रेल्वे पुढे निघून गेली. अशोक एका पायाने अंपग असल्यामुळे रेल्वेतून उतरून आयुषला उचलणे त्यांना शक्य झाले नाही. ही बाब जीआरपी पोलिसांच्या चौकशीत पुढे आली.मुलाची छायाचित्रे व्हाटसअ‍ॅपद्वारे सगळीकडे पाठविण्यात आली होती. त्या मुलाची बल्लारशा येथील आयुष रोहिदास अशी ओळख पटली. त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे.- राजेंद्र नागरे, पोलीस उपनिरीक्षक, जीआरपी.