शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्ध्व वर्धाच्या कालव्यात दोघे गेले वाहून; तिवसा, मोर्शी येथील उजव्या कालव्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:10 IST

तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, तिवसा तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील शेंदूरजना बाजार ...

तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, तिवसा तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील शेंदूरजना बाजार येथील शेतकरी गणेश आसोडे यांच्या शेतातून त्यांचा मुलगा नीलेश हा भाजीपाला आणत होता. भाजीपाला धुण्यासाठी तो कालव्यात उतरला. त्याच्या मागेच वडील उभे होते. दरम्यान, पाय घसरून पडल्याने तो बारा फूट खोल कालव्यात पडला. त्याला वाचविण्याचे वडिलांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. पोहता येत नसल्याने व कालव्याचे पाणी वाहते असल्याने तो तग धरू शकला नाही व यातच त्याचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर नीलेशचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू होती. वडिलांदेखत तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरी घटना मोर्शी तालुक्यात रविवारी घडली. येथील गिट्टी खदान परिसरात राहणारा राजू विठ्ठल बोरावार धरणातून निघणाºया कालव्यातून मासेमारी करून परत येत असताना शौचास गेला. कालव्यात उतरत असताना त्याचा पाय घसरल्याने तो वेगवान प्रवाहात सापडला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याचा मृतहेद घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरावर सापडला. ज्या ठिकाणी तो बुडाला, ते ठिकाण धरणापासून केवळ ५० फूट अंतरावर आहे. येथे कालव्याची खोली अंदाजे १५ फूट आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास मोर्शीचे ठाणेदार राजेश राठोेड करीत आहेत. उजवा कालवा मोर्शी, तिवसा धामणगाव व वर्धा जिल्ह्यातील पुलगावपासून पुढे जातो.

टॅग्स :Amravatiअमरावती