शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

बनावट फिटनेस प्रमाणपत्राचा गौरखधंदा, दोघांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST

अमरावती : वाहन परवाना काढण्यासाठी वाहनचालकाला लागणारे बनावट वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र तयार करून डॉक्टरच्या नावाचे खोटे स्टँप (शिक्का)चा ...

अमरावती : वाहन परवाना काढण्यासाठी वाहनचालकाला लागणारे बनावट वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र तयार करून डॉक्टरच्या नावाचे खोटे स्टँप (शिक्का)चा गैरमार्गाने वापर करणाऱ्या ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलच्या संचालकाचा भंडाफोड गाडगेनगर पोलिसांनी करून गुरुवारी दोघांना अटक केली. शुक्रवारी दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

उघडकीस आलेल्या गौरखधंद्यात आणखी कुठल्या दलाल किंवा एजंटचा सहभाग आहे व कुठल्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू होता. तसेच अशाप्रकारे बनावट फिटनेस सर्टिफिकेट किती जणांना देण्यात आले. याचे धागेदोरेही गाडगेनगर पोलीस शोधून काढणार असल्याचे तपास अधिकारी पीएसआय राजेंद्र लेवटकर म्हणाले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या परिसरालगत एका इमारतीत ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलने व्यवसाय थाटला होता. सदर स्कूलवर पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकल्यानंतर संचालक योगेश प्रभुराव घुगे( रा. कॅम्प सुंदरलाल चौक), ऑपरेटर अंकुश गणोरकर ( रा. अमरावती) याला अटक केली होती.

बॉक्स:

डॉक्टरचा अमरावतीत थांगपत्ता नाही

ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूलव्दारे ज्या वाहनचालकांना वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येत होते. ते बनावट असल्याचे उघड झाले आहे. एमबीबीएस असलेले वैभव गरकळ नामक डॉक्टरचे स्टँप व त्यांची स्वाक्षरीचा वापर प्रमाणपत्रावर केला जात होता. सदर डॉक्टरचे वैद्यकीय रजिस्ट्रेशन आहे. मात्र सदर डॉक्टर अमरावतीत प्रॅक्टिस करीत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यांचा अमरावतीत थांगपत्ता नाही. किंवा वास्तव्यसुद्धा नाही. त्यामुळे त्यांनी एकाही वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी केली नसल्याची बाब पुढे आली. ड्राईव्हिंग स्कूलच्या संचालकांनी डॉक्टरच्या नावाचा बनावट शिक्का तयार करून तसेच वाहनचालकांना वाहन परवाना काढण्यासाठी लागणाऱ्या फिटनेस सर्टिफिकेवर डॉक्टरची खोटी स्वाक्षरीसुद्धा संचालकांनीची केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डॉक्टराचा शोध घेऊन बयाण पोलीस नोंदविणार आहे.

बॉक्स

शहरातील डॉक्टरांची माहिती मागविली जाणार

ट्रान्सपोेर्ट जसे ट्रक, बस व इतर परिवहन संवर्गातील टॅक्सी वाहनांच्या वाहनचालक परवान्यासाठी वाहनचालकांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ते वाहनचालक किंवा ड्राईव्हिंग स्कूलचे संचालक बाहेरूनच प्रमाणपत्र काढतात. यावर आरटीओचे तसे नियंत्र नसते. परंतु या प्रकरणानंतर सोमवारी एक आदेश काढून कुठले-कुठले डॉक्टर असे वैद्यकीय प्रमाणपत्र देतात त्यांची अमरावतीत वैद्यकीय सेवा कुठे आहे? त्यासंदर्भात यादी आरटीओ मागविणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते म्हणाले.

बॉक्स

पोलिसांनी केले चार स्टॅम्प जप्त

बनावट वैद्यकीय फिटनेस देताना तीन ड्राईव्हिंग स्कूलचे तसेच एका डॉक्टराचा स्टॅम्प पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले. यात ज्ञानेश्वर ड्राईव्हिंग स्कूल, महाराष्ट् ड्राईव्हिंग स्कूल अमरावती, ढोले ड्राईव्हिंग स्कूल वरूड व डाॅक्टर वैभव गरकल यांच्या नावाचे स्टॅम्प आढळून आले. या ड्राईव्हिंग स्कूलने आतापर्यंत किती जणांना बनावट प्रमाणपत्र दिले याची चौकशीही पोलीस करीत आहेत. सदर वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र वाहनचालकांना काढून देण्याकरिता प्रत्येकी तीन हजारांचे शुल्क आकरण्यात येत असल्याची माहिती समोर आली.

कोट

ड्राईव्हिंग स्कूलने ज्या लोकांना असे बनावट वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र दिले असेल त्या वाहनचालकांचा शोध घेऊन दुसऱ्या डॉक्टरांनकडून त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट मागविले जाईल.

- रामभाऊ गिते, आरटीओ अमरावती