शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जदार शेतकरी केंद्राच्या सवलतीला मुकणार

By admin | Updated: April 17, 2017 00:16 IST

कर्जमाफीच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी सेवा सोसायट्यांवर बँकांच्या पीक कर्जाची ३१ मार्चअखेर परतफेड केलेली नाही.

कर्जमाफीकडे डोळे : ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याचा फटकाजितेंद्र दखणे अमरावतीकर्जमाफीच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी सेवा सोसायट्यांवर बँकांच्या पीक कर्जाची ३१ मार्चअखेर परतफेड केलेली नाही. १ एप्रिल २०१६ नंतर घेतलेले परंतु ३१ मार्च २०१७ पर्यंत फेडलेले एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने होते, तर एक ते तीन लाखापर्यंतचे कर्ज एक टक्का व्याजाने होते. हे कर्ज परतफेड न केलेले शेतकरी केंद्राच्या व्याज सवलतीलाही मुकले आहेत. आता ३० जूनपर्यंत या शेतकऱ्यांनी कर्जपरतफेड केली, तर त्यांना राज्य शासनाच्या तीन टक्के व्याजमाफीचा फायदा मिळणार आहे.सोसायट्या व बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या जास्तीत जास्त एक लाखापर्यंतच्या कर्जाला केंद्र शासन तीन टक्के तर राज्य शासन तीन टक्के व्याज सवलत देते. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा फायदा मिळतो. दरम्यान एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जावर केंद्र सरकार तीन टक्के तर राज्य शासन एक टक्का व्याज सवलत देते. त्यासाठी शेतकऱ्यांनी एप्रिलनंतर पीक कर्ज काढून मार्चअखेरपर्यंत त्यांची परतफेड करणे गरजेचे होते. मार्चअखेरपर्यंत कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळत नाही. पुढे जूनपर्यंत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त राज्य शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ मिळतो. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल, या आशेने ३१ मार्चअखेर कर्ज परतफेड केलेली नाही. त्यामुळे सोसायट्याच्या व बँकांच्या कर्जवसुलीवर परिणाम झाला आहे. आता या शेतकऱ्यांनी जून २०१७ अखेर कर्ज परतफेड केली नाही तर ही पीककर्जे थकबाकीत जातील. कर्जमाफी झाली नाही, तर थकबाकीदार शेतकऱ्यांना १०.५० टक्के व्याज आणि दंड व्याज असा भुर्दंड बसणार आहे. शेतकरी दरवर्षी थकबाकी नको म्हणून ३१ मार्चपूर्वी कशीतरी कर्ज परतफेड करतात. काही शेतकरी उसनवार किंवा व्याजाने पैसे घेऊन भरतात आणि कर्ज जुन्याचे नवे करून घेतात. परंतु यावर्षी कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत कर्ज परतफेड केली नाही. (प्रतिनिधी)