शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधितांना ‘रेडी टू लिव्ह’ सुविधेसह मूलभूत सुविधांचा बूस्टर! निम्न पेढी प्रकल्प

By प्रदीप भाकरे | Updated: February 26, 2024 21:56 IST

पाच पुनर्वसित गावात बाजार ओटे अन् अंगणवाडी बांधकाम

प्रदीप भाकरे, अमरावती: भातकुली तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्पबाधितांची पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्णत: बुडीत पाचही गावातील लोक हळूहळू मूळ गाव सोडून पुनर्वसन स्थळी येऊ लागले आहेत. त्याअनुषंगाने प्रकल्पबाधितांना ‘रेडी टू लिव्ह’ मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच पाचही पुनर्वसित गावात बाजार ओटे, अंगणवाडी व स्मशान शेडसाठी संरक्षण भिंती उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी ३ कोटी रुपये खर्चिले जाणार आहेत.

निंभास्थित पेढी नदीवर निम्न पेढी सिंचन प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पामुळे कुंड खुर्द, कुंड सर्जापूर, अळणगाव, हातुर्णा व गोपगव्हान ही पाच गावे पूर्णता बाधित झाली आहेत. त्यामुळे त्या पाचही गावांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पाचे बांधकाम ९० टक्क्यांवर थांबल्याने व अद्यापही घळभरणी न झाल्याने बाधित कुटुंबांची पुनर्वसनस्थळी घरे बांधण्यास मर्यादा आली आहे. मात्र ते यावेत, यासाठी आता सुमारे तीन कोटींमधून पाचही पुनर्वसित क्षेत्रात बाजार ओटे व अन्य सुविधा साकारल्या जाणार आहेत.

बाजार ओटा अन् स्मशानशेडला आवारभिंतहातुर्णा येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन मौजा रायपूर पांढरी येथे झाले आहे. तेथे ७३.३१ लाख रुपये खर्चून सिमांकन नाली व रस्ता ओलांडण्याकरिता स्लॅबचे बांधकाम सुरू होणार आहे. तेथेच ४१.९८ लाख रुपये खर्चून स्मशान शेडसाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे, तर २७.८५ लाख रुपये खर्चून पांढरी रायपूर या पुनर्वसन स्थळी २७.८५ लाख रुपये बाजार ओटा बांधला जाणार आहे. गोपगव्हान येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन लोणटेक येथे करण्यात आले. तेथे ३६.५९ लाख रुपये खर्चून संरक्षणभिंत व १५.९१ लाख रुपयांतून बाजार ओटा साकारला जाईल.///////कुंड खुर्द, सर्जापूर, अळणगावातही बांधकामकुंडखुर्द (कठोरा) येथे ३१.५७ लाखांतून स्मशानशेडसाठी संरक्षण भिंत, तर २६.६० लाख रुपयांतून अंगणवाडी इमारत, तर १९.८७ लाख रुपयांमधून बाजार ओट्याचे बांधकाम होईल. कुंडसर्जापूर येथे २०.६६ लाखांतून, तर अळणगावकरांसाठी पुनर्वसित कठोरा येथे २७.८३ लाख रुपये खर्चून बाजार ओटा साकारला जाणार आहे.////कुणाचे पुनर्वसन कोठे?मूळ गाव : पुनर्वसन ठिकाणअळणगाव : कठोराकुंड खुर्द : कठोरागोपगव्हान : लोणटेककुंड सर्जापूर : कुंड सर्जापूर रोडहातुर्णा : पांढरी रायपूर////////कोटनिम्न पेढी प्रकल्पातील प्रकल्पबाधित कुटुंब पुनर्वसन स्थळी घरे बांधू लागली आहेत. पुनर्वसन ठिकाणी ३ कोटी रुपयांतून बाजार ओटे, अंगणवाडी व स्मशानशेडला संरक्षण भिंती उभारल्या जाणार आहेत.गणेश कथले, कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग

टॅग्स :Amravatiअमरावती