शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून मेळघाटात घुंगरू बाजाराची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:50 IST

दिवाळीनंतर शुक्रवारी गोवर्धन पूजा केल्यानंतर शनिवार, २१ आॅक्टोबरपासून मेळघाटातील प्रत्येक आठवडी बाजाराला ‘घुंगरू बाजाराचे’ स्वरूप लाभणार आहे.

ठळक मुद्देआठवडाभर मेजवानी : गोंडी नृत्याने येणार रौनक

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : दिवाळीनंतर शुक्रवारी गोवर्धन पूजा केल्यानंतर शनिवार, २१ आॅक्टोबरपासून मेळघाटातील प्रत्येक आठवडी बाजाराला ‘घुंगरू बाजाराचे’ स्वरूप लाभणार आहे. मेळघाटातील दºयाखोºयांत वास्तव्य करणाºया आदिवासी गोंड बांधवांसाठी घुंगरू बाजाराचे विशेष महत्त्व आहे.मेळघाटातील कोरकू बांधव ज्याप्रमाणे होळीनंतरच्या सहा दिवसांत ‘फगवा’ उत्सव साजरा करतात, त्याचप्रमाणे गोंड समाजाचे बांधवांसाठी दिवाळी ही उत्सवाची पर्वणी राहते. ‘घुंगरू बाजार’ यालाच ठाट्या बाजार म्हणूनही संबोधण्यात येते. दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर दुसºया दिवशी जनावरांची गावपूजा असते. गावाबाहेर गाय, म्हैस व इतर गोधन एका ठिकाणी जमा केले जाते. यावेळी सर्वांना रंगरोगन करून सजविण्यात येते. तेथे फटाक्यांची आतषबाजी होते.गोवर्धन किंवा गावपूजा झाल्यावर गोंडी बांधव नवीन कपडे परिधान करून तालुक्यात येणाºया प्रत्येक आठवडी बाजारात जाऊन गोंडी नृत्य सादर करतात. याप्रसंगी गोंड बांधवांचा विशेष पेहराव असतो. यात पांढरा शर्ट, पांढरे धोतर, शर्टवर काळा कोट किंवा जॅकेट, डोळ्यावर काळा चष्मा, डोक्यावर धुर्रेदार पगडी, हातात बासरी व कवळ्यांची माळ्यांची लटकन घालून बहारदार गोंडी नृत्य सादर करण्यात येते. वाजंत्रीच्या साधनात ढोलक, मातीची बनविलेली टिमकी, आणि म्हशीच्या शिंगाची लांबलचक पुंगी यांचे विशेष आकर्षण असते. शनिवार २१ आॅक्टोबरला कळमखार, रविवार २२ ला चाकर्दा, सोमवार २३ ला वैरागड व बिजुधावडी, मंगळवार २४ ला टिटंबा, बुधवार २५ ला हरिसाल, गुरुवार २६ ला सुसर्दा आणि शुक्रवार २७ २२ आॅक्टोबरला धारणीत घुंगरू बाजाराची विशेष मेजवानी पर्यटकांना भुरळ घालणारी ठरणार आहे.