जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : तोवर सावरखेड पुलावरून जड वाहनांना बंदीअमरावती : पेढी नदीवरच्या सावरखेड येथील क्षतिग्रस्त बंधाऱ्यांसाठी नवे अंदाजपत्रक तयार करून तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिले. पावसाने बाधा न आणल्यास दोन आठवडयात पूलाची दुरुस्ती करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने आश्वासित केले. तोवर या पूलावरून २ टनावरील जड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्याचे निर्देश सावरखेड ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.सावरखेड येथील पुल कम बंधाऱ्यावरची वाहतूक बंद करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या गावातील नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता. सांगा, अडीच हजार नागरिकांना मार्ग कोणता ? ही जनभावना 'लोकमत'ने लावून धरली असता या विषयावर सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते व रवि राणा यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सावरखेड येथील 'पूल वजा बंधाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी नवे अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन युध्दस्तर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तोवर या पुलावरुन ट्रक, ट्रॅक्टर, आदी २ हजारावरील जड वाहतूकीस बंदी घालण्यात आली. या विषयीचे निर्देश ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.या पुलाची दुरुस्ती करण्याविषयी सावरखेड ग्रामपंचायतीने १६ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या सभेत ठराव घेऊन जलसंपदा विभागाकडे मागणी केली होती. मा, ग्रामपंचायतीच्या निवेदनावर या विभागाने कुठलीही कार्यवाही केली नाही. 'लोकमत'ने याविषयी वृत्तमालिकेद्वारे लोकदरबारात हा प्रश्न मांडला असता निद्रिस्त प्रशासनाला आता जाग आली आहे. (प्रतिनिधी)सावरखेड बंधाऱ्यासंदर्भात सोमवारी बैठक झाली येथील नागरिकांनी पर्यायी रस्ता उपलब्ध करण्याबाबत पाहणी करण्याचे व दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिले.वैशाली पाथरे, तहसीलदार भातकूलीनवे अंदाज करून काम सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. याविषयी अभियंत्याशी मंगळवारी बैठक आहे. पावसाचे अडसर नसल्यास १५ दिवसांत बंधाऱ्याची दुरुस्ती पूर्ण होईल.- सुनील झाडे, उपअभियंता,लघु पाटबंधारे विभाग
१५ दिवसांत बंधाऱ्याची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 00:02 IST