शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बोगस बियाणे उठले शेतकऱ्यांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाट्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी तब्बल नऊ लाख रुपयांचे बनावट बियाणे गस्तीदरम्यान पकडले. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या खरिपात बोगस बियाण्यापासून वाचले आहेत. तालुक्याची स्थिती पाहता, पाच वर्षांपासून या तालुक्यात बोगस बियाण्याचा धंदा अधिक फोफावला आहे.

ठळक मुद्देपोलीस आवळणार मुसक्या : किती घेणार बळी? दरवर्षी शेकडो एकर जमीन पडीक

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : भरदार बियाणे, दमदार उत्पादन, त्यात इतर नामांकित कंपन्यांच्या भावापेक्षा किंमत कमी आणि हमखास पिकणार याची हमी देत तालुक्यात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. दरवर्षी शेकडो एकर जमीन या बोगस बियाण्यांमुळे पडीक राहत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलीस व कृषी विभाग बोगस बियाण्यांच्या मुळाशी कधी पोहोचणार व शेतकºयांचे दरवर्षी जाणारे बळी कधी थांबणार, हा सवाल अनुत्तरित आहे.धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाट्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी तब्बल नऊ लाख रुपयांचे बनावट बियाणे गस्तीदरम्यान पकडले. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या खरिपात बोगस बियाण्यापासून वाचले आहेत. तालुक्याची स्थिती पाहता, पाच वर्षांपासून या तालुक्यात बोगस बियाण्याचा धंदा अधिक फोफावला आहे. बंद असलेल्या किंवा सरकारने ज्या कपाशी बियाण्यावर बंदी घातली, अशा कंपनीचे बियाणे तालुक्यात आणणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती कृषी विभागाला असूनही या गंभीर बाबीकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे दरवर्षी तालुक्यातील शेतकरी नामांकित कंपनीचे म्हणून हे बियाणे खरेदी करतात. मात्र, काही निरक्षर शेतकºयांना ही गंभीर असणारी बाब लक्षात येत नाही. ज्यावेळी शेतात हे कपाशीचे अथवा इतर व्हेरायटी बियाणे निघत नाही, त्यावेळी संबंधित शेतकरी कृषिसेवा केंद्र अथवा ज्यांच्याकडे परवाना नाही, अशा व्यक्तीकडून मीमांसा करतात. अधिक पाऊस झाला, पेरणी व्यवस्थित केली नाही म्हणून शेतातील बियाणे दडपले, तर कधी अल्प पावसामुळे शेतातील बियाणे निघाले नाही, असे शेतकºयांना पटवून दिले जाते. काही कृषिसेवा केंद्राचे संचालक शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतात. फसगत टाळण्यासाठी अशांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे तहसीलदार कांबळे म्हणाले.नावापुरतेच केवळ भरारी पथकधामणगाव तालुक्यात दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने भरारी पथकांची निर्मिती करण्यात येते. विशेष म्हणजे, पथकातील काही अधिकारी कृषिसेवा केंद्र संचालकांकडे एकट्याने जाऊन दुकानाची तपासणी करतात. संबंधित दुकानात केवळ रेट बोर्ड , स्टॉक रजिस्टर याची तपासणी होते. मात्र, संबंधित दुकानाच्या गोडाऊनमध्ये कोणता मालक किती, याची तपासणी केली जात नाही. जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्राच्या तोंडावर एका कृषी अधिकाºयाने मंगरूळ दस्तगीर परिसरातील एका संचालकाकडे जाऊन ‘नियोजन’ व्यवस्थितपणे करून घेतले असल्याची चर्चा या परिसरात आहे.विशिष्ट दुकानातून विक्रीधामणगाव तालुक्यात सोमवारी बोगस बियाणे पकडण्यात आले. असे बियाणे दरवर्षी तालुक्यात येते. त्याची पेरणी होते. पूर्वी ते विशिष्ट दुकानांमध्ये मिळायचे. आता तालुक्यातील लहान-मोठे गावांतही त्याचे लोण पसरले आहे गत हंगामात एचटीबीटीच्या नावाखाली अनेक शेतकºयांना बोगस बियाणे विकण्यात आले. पेरलेले न उगवल्याने ते देशोधडीला लागले आहेत.पोलीस करणार पर्दाफाशतब्बल नऊ लाखांचे बोगस बियाणेप्रकरणी चालकाला अटक झाली. बियाणे कुठून आणले, धामणगाव तालुक्यात कोणत्या कृषिसेवा केंद्राकडे हे बियाणे उतरणार होते, बोगस बियाणे बोलावणाºयांमध्ये कोण-कोण सहभागी आहे, कृषी विभागातील अधिकाºयांचा हात आहे का, याचा पोलीस विभाग तपास करीत आहे. बोगस बियाण्याचे रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्याचे तळेगावचे ठाणेदार अशोक कांबळे यांनी सांगितले.धामणगाव तालुक्यात केवळ कृषी विभागच नव्हे, तर आता महसूल विभागाचे संयुक्त भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. पथकातील अधिकारी स्वतंत्रपणे तपासणी करणार असेल, कारवाईचा प्रस्ताव संबंधित विभागाला पाठविण्यात येईल- भगवान कांबळे, तहसीलदार

टॅग्स :agricultureशेती