शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By admin | Updated: May 30, 2015 00:29 IST

आठ-दहा वर्षांपासून परिसरातील आदिवासी भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा ...

आदिवासींच्या जीवाशी खेळ : ना कोणती पदवी ना कुठली शाश्वती अरूण पटोकार पथ्रोट आठ-दहा वर्षांपासून परिसरातील आदिवासी भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी स्थानिक व आदिवासी भागातील भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवाची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जिविताशीही खेळ चालविला आहे. जास्त भावाने स्वत: जवळचे गोळ्या औषध व सलाईन देवून आदिवासींची फसवणूक पुरुष गब्बर बनले आहेत. या बिनडिग्री बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे आदिवासी खेड्यामध्ये अनेक रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र आदिवासी मंडळींना याबाबत काही अनुभव व अनभिज्ञ असून रुग्ण आजाराने दगावला असे चित्र या बोगस डॉक्टरकडून उभे करून रुग्णांच्या घरच्यांची समजूत काढून त्यावर पडदा टाकण्याचे काम या बोगस डॉक्टरांकडून सतत केले जाते. सद्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून काही अती तापमान तर कधी केवळ पावसाचे वातावरण अशा परिस्थितीत हवामानात झालेल्या बदलाने अतिसार, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार दिसू लागले आहेत. अतिदुर्गम भागातील आदिवासींना परतवाडा, अंजनगाव, पथ्रोट हे अंतर लांब असल्याने आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते जवळच्याच झोलाछाप बोगस डॉक्टरकडून उपचार करून घेतात परंतु या डॉक्टरकडे कोणत्याच प्रकारची पदवी (डिग्री) किंवा उपचाराचे विधीवत प्रशिक्षण नसतानाही ते सलाईन आणि जड इंजेक्शनचा वापर करून रुग्णांची फसवणूक करीत आहे. यामध्ये दरवर्षी कितीतरी रुग्णांना आपला जिव गमवावा लागतो. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्याचे संबंधितांना आदेश दिल्यामुळे परिसरातील बोगस डॉक्टर जोपर्यंत शासनाची कडक कार्यवाही होणार नाही तोपर्यंत यांच्या बोगस प्रॅक्टीसला व फसवणुकीला आळा बसणार नाही व आदिवासींच्या जिवाशी खेळणारा खेळ थांबणार नाही. या अगोदर याबाबत काही खेड्यातील सुज्ञ नागरिकांनी अनेक तोंडी तक्रार केल्या. मात्र बोगस डॉक्टरवर थातूरमातूर कार्यवाही व पोलिसांना चिरीमिरी देऊन आपला बोगस व्यवसाय आजपर्यंत चालूच ठेवला आहे. यावर कुठेतरी अंकुश लावणे काळाची गरज आहे. काही डॉक्टर हे आपल्या घरातील दवाखान्यामध्ये दैनंदिन वापरण्यात येणार उपकरणे ठेवत नसून गाडीवर बसून उपकरणे बॅगेमध्ये ठेवून आदिवासी भागामध्ये फिरून आपला गोरखधंदा चालवितात. त्यांचे साहित्य जप्त करुन त्यांचेवर कडक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणीही आहे. अनेक दिवसांपासून सुरू आहे गोरखधंदाजिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्ह्यात आवश्यक वैद्यकिय पात्रता नसणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने काही ठिकाणी बोगस डॉक्टरांना तात्काळ अटक करण्यात आली. परंतु पथ्रोट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून आपले बस्तान मांडून असलेले परप्रांतीय बोगस डॉक्टर मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत आहे. हा प्रकार धक्कादायक असून गोरगरिब रुग्णांचाजीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे.