शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

बोगस ‘डीन’प्रकरणी फौजदारीचे संकेत

By admin | Updated: January 25, 2017 00:06 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता(डीन) पदी बोगस नियुक्तीप्रकरणी कुलगुरुंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

कुलगुरुंचे आदेश : ‘बीसीयूडी’ संचालकाकडे जबाबदारीगणेश वासनिक अमरावतीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता(डीन) पदी बोगस नियुक्तीप्रकरणी कुलगुरुंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘डीन’ एम.एच.लकडे यांच्या नियुक्तीशी जुळलेल्या इतरही बाबींची चौकशी करून ‘बीसीयूडी’ संचालकांकडून अहवाल मागविला आहे.कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठाच्या शिक्षण विद्याशाखेत झालेल्या नियमबाह्य कारभाराच्या सत्यतेच्या तपासणीची जबाबदारी बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूरकर यांच्याकडे सोपविली आहे. शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सुरु असलेल्या गैरकारभाराचे वास्तव उघडकीस आणल्याबद्दल ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. आर्थिक व्यवहाराचा संशयअमरावती : ‘डीन’ पद मिळविण्यासाठी एम.एच.लकडे यांनी गाठलेली पातळी जाणून घेतल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनही अवाक झाले आहे. यवतमाळ येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापकपदी कार्यरत एम.एच.लकडे यांची ‘डीन’ म्हणून विद्यापीठात जुलै २०१४ मध्ये नियुक्ती झाली. तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी ‘डीन’ पदाला मान्यता दिली असून खेडकरदेखील संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. लकडे यांनी ‘डीन’ पद मिळविताना काही आर्थिक व्यवहार केला काय, हेसुद्धा जाणून घेतले जाणार आहे. शिक्षण विद्याशाखा ‘डीन’ पदी वर्णी लावताना लकडे यांनी दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ते प्राचार्यपदी कार्यरत असल्याचे संस्थाचालकांचे पत्र विद्यापीठाला सादर केले होेते. त्यामुळे संस्था चालकांनी दिलेले पत्र खरे की खोटे, हे देखील आता चौक शीअंती स्पष्ट होणार आहे. विद्यमान कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी ही चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व्हावी, अशा सूचना बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूरकर यांना दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. कायदे, नियम गुंडाळून ‘डीन’पदी लकडे यांना नियुक्ती देताना कोणाचा सहभाग होता, या खोलात शिरले जाणार आहे. लकडे यांनी संस्थाचालकांचे प्राचार्यपदी कार्यरत असल्याचे पत्र बनावट आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्याचे संकेत विद्यापीठातून वर्तविले जात आहेत. तत्कालीन कुलगुरु मोहन खेडकर यांच्या अफलातून कारभारामुळे यापूर्वी विद्यापीठाची नामुष्की झाली असताना आता बोगस ‘डीन’चे प्रकरण हीदेखील त्यांचीच लीला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)राज्यपालांकडे ‘डीन’ यांची तक्रारविद्यापीठात शिक्षण विद्याशाखेच्या ‘डीन’पदी एम.एच.लकडे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नियमबाह्य मार्गाने नियुक्ती मिळविल्याप्रकरणी राज्यपाल व्ही.विद्यासागर राव यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. एम.एच. लकडे यांच्या ‘डीन’ पदी नियुक्तीची चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे निर्देश कुलगुरु चांदेकर यांना राज्यपाल कार्यालयातून मिळाले आहे. मात्र, एम.एच.लकडे यांना अभय कोणी दिले,हा संशोधनाचा विषय आहे.शिक्षण विद्याशाखा अधिष्ठातापदी एम.एच. लकडे यांच्या नियुक्तीप्रकरणाची चौकशी होणार असून हे पद नियमबाह्य असल्यास कारवाई होईल. चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे. राज्यपालांनीही चौकशीचे पत्र दिले आहे.-मुरलीधर चांदेकर, कुलगुरू लकडे यांनी विद्यापीठात ‘डीन’ पदी कार्यरत असताना अनेक नियमबाह्य कामे केली आहेत. याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली असून चौकशी सुद्धा सुरु झाली आहे. आर्थिक व्यवहाराची चौकशी होणे अपेक्षित आहे.- अजय गुल्हाने,तक्रारकर्ते, अमरावती.