शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ योजनेत पुन्हा बोगस लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 00:13 IST

केंद्र व राज्य शासनाने देशातील गरिबांना व वृद्धांना मदतीचा हात मिळावा म्हणून संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ‘श्रावण बाळ योजना’ सुरू केली.

पात्र लाभार्थ्यांना डावलले : पोहरा गावकऱ्यांची व्यथा, दलालांवर असावा अंकुशश्यामकांत पाण्डेय धारणीकेंद्र व राज्य शासनाने देशातील गरिबांना व वृद्धांना मदतीचा हात मिळावा म्हणून संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ‘श्रावण बाळ योजना’ सुरू केली. या योजनेत ६५ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील वृद्धांचा समावेश करण्यात आला. मात्र वयोमर्यादा पूर्ण न करणाऱ्यांची नावे दलालामार्फत पात्रता यादीत समावेश करण्यात आल्याचे निदर्शनास आले. २०१४ मध्ये याच योजनेंतर्गत २५ वर्षांच्या युवकांना लाभ देण्यात आले होते. याची वाच्यता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासमोर हरिसाल या गावातील वृद्धांनी केली होती. त्यावेळी गित्ते यांनी या बोगस लाभार्थ्यांची ओळखपरेड स्वत: करून घेतली. याप्रकरणी दोषी असलेल्या नायब तहसीलदार सोळंके यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन अटकसुद्धा करण्यात आली होती. सध्या ते प्रकरण पोलीस तपासात प्रलंबित आहे. या प्रकरणामुळे श्रावण बाळ योजना तात्पुरत्या स्वरुपात बंद करून चौकशी प्रारंभ करण्यात आली होती. त्यात हजारो बोगस लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येऊन त्यांचे अनुदान बंद करण्यात आले होते. आता पुन्हा नव्याने संपूर्ण आवश्यक कागदपत्रे बोलाविण्यात येऊन नव्याने यादी तयार करण्यात येत आहे. मात्र नवीन यादीतही बोगस लाभार्थींना पात्र करण्यात आल्याचा आरोप पोहरा या गावातील नागरिकांनी केला आहे. पोहरा येथील सुज्ञ नागरिकांनी पात्र लाभार्थ्यांची जन्मतारीख शाळेच्या रजिस्टरवरून काढून पुराव्यादाखल प्रस्तुत प्रतिनिधीकडे आणून दिली आहे. गावात एकूण ६० च्या जवळपास अपात्र व बोगस लाभार्थी असून पात्र ३५ लाभार्थी या योजनेतून अपात्र केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. याबाबत संजय गांधी नायब तहसीलदार जी. ई. राजगडे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते सुटीवर असल्याचे कळले. प्रभारी नायब तहसीलदार पी. एम. सिंगाडे यांचेशी संपर्क केल्यावर त्यांनी सर्व प्रकरण आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र व वैद्यकीय दाखला यांच्या आधारे तयार करण्यात आल्याचे सांगितले. धारणी तालुक्यात अनेक पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. त्यांचा श्रावणबाळ योजनेच्या पात्रता यादीत समावेश करण्याची एकमुखी मागणी होत आहे. समावेश केलेले नावे जन्म तारखेची यादी तपासून तयार करण्यात येईल, असे सांगितले. अपात्र लाभार्थ्यांची नावे, जन्मतारीख हिरालाल रामदीन मेटकर (१.७.५१), राजाराम मानू भिलावेकर (७.१२.५३), शंकर चुन्या जांबेकर (३.१.५६), भुरेलाल हिरालाल मावस्कर (८.९.५६), दादू सावरू कास्देकर (१६.७.५७), हिरालाल रामजी पाटणकर (७.६.५९), रामलाल रामदीन मेटकर (१२.४.५९), रामकिसन सानू ठाकरे (२५.५.६०), सखाराम डोकरा ठाकरे (७.८.६०), बाबुलाल पटेल कास्देकर (१.९.६३), दयाराम बाबू कास्देकर (१५.७.६६), नंदकिशोर पटेल कासदेकर (६.९.६८), चंपालाल भाऊ कास्देकर (४.५.६६), बाबुलाल बानु कास्देकर (५.४.६३) आणि भुरेलाल हिरालाल मावस्कर (८.९.५६) असे पोहरा येथील बोगस लाभार्थी आहेत.