शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात बोगस एलईडी दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:02 IST

शहरात नव्याने लागलेल्या एलईडी दिव्यांखालीच अंधार असून, या न लागणाऱ्या दिव्यांसाठी संबंधित कंपनीकडून पाच लाख रुपयांची वसुली करण्याचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पारित करण्यात आला.

ठळक मुद्देन.प.ची सर्वसाधारण सभा : पाच लाख रुपये दंडाचा ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शहरात नव्याने लागलेल्या एलईडी दिव्यांखालीच अंधार असून, या न लागणाऱ्या दिव्यांसाठी संबंधित कंपनीकडून पाच लाख रुपयांची वसुली करण्याचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पारित करण्यात आला. नगरसेवकांनी प्रशासनाला या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्यासोबत शहरातील अंधार दूर करण्याची मागणी केली.पीठासीन सभापती तथा नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या पुढाकाराने ई.ई.एस.एल. कंपनीला पाच लाख रूपये दंड वसूल करण्यात यावा, या विषयीचा ठराव मांडण्यात आला होता. सर्वानुमते तो मंजूर करण्यात आला. शहरात जवळपास २२०० पथदिवे लावण्याचा करार ईईएसएल कंपनीशी करण्यात आला होता. त्यापैकी ४० टक्केच लागले असून, मोठ्या प्रमाणावर दिवे बंद आहेत.तत्पूर्वी, ४ जून २०१८ चे शासननिर्णयानुसार अंजनगावात ई.ई.एस.एल. कंपनीमार्फत शहरात एलईडी पथदिवे लावण्यास सुरुवात झाली होती. ऐन गणेशोत्सव ते दसºयाच्या काळात लागलेले पथदिवे पूर्णपणे बंद अवस्थेत आढळून आले. ऐन उत्सवाच्या काळात शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. शहरवासीयांनी असंतोष व्यक्त केला, तर नगरसेवकांसाठी ही बाब डोकेदुखी ठरली होती. यासंदर्भात नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांकडे तक्रार केली होती. नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे व नगरसेवक मनोहर भावे, मधुकर गुजर, रवींद्र बोडखे, सचिन जायदे, मनोहर मुरकुटे, उत्तम मुरकुटे, भूपेंद्र भेलांडे, नीलेश ईखार, हेमंत माकोडे यांनी शहरातील पथदिव्यांची पाहणी करून ते त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले तसेच तीन वेळा पत्रव्यवहार करूनही कंपनीकडून या समस्येचे कोणतेही निरसन झाले नाही.ईईएसएल कंपनीमार्फत शहरात एलईडी पथदिवे बसविण्यात आले होते. त्या लावलेल्या दिव्यांबाबत नागरिकांच्या सततच्या तक्रारी व नगरसेवकांच्या तक्रारीमुळे व सदर कंपनीच्या ढिसाळ कारभारबाबत सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन कंपनीवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवित आहे.- श्रीकृष्ण वाहूरवाघ, मुख्याधिकारी