शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

हत्येनंतर महिलेचा मृतदेह फेकला छत्री तलावात

By admin | Updated: May 17, 2017 00:06 IST

हत्येनंतर दगडाने बांधून मृतदेह छत्री तलावात फेकल्याची घटना सोमवारी उघड झाली.

अनैतिक संबंधातून घटना : पती ताब्यात, भाच्याचा शोध सुरूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हत्येनंतर दगडाने बांधून मृतदेह छत्री तलावात फेकल्याची घटना सोमवारी उघड झाली. नीता दिलीप इंगोले (२५,रा.फे्रजरपुरा) असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या घटनेत गुन्हे शाखेने पती दिलीप इंगोलेला ताब्यात घेतले आहे. दिलीपचा भाचा नागपूर येथील रहिवासी आकाशचा शोध पोलीस घेत आहे. पोलीस सूत्रानुसार, सोमवारी सायंकाळी छत्री तलावाच्या पाण्यात एका सर्पमित्राला मृतदेह तरगंताना आढळला. त्याने ही माहिती राजापेठ पोलिसांना दिली. त्या आधारे एएसआय रवींद्र सर्वटकर व तायवाडे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. मात्र, रात्रीच्या अंधारात मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पोलीस तपासणीदरम्यान महिलेचा मृतदेह नग्नावस्थेत होता, तसेच तिचा गळा कापलेला, पाठीवर जखमा व हातावर नीता असे नाव गोंदल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी हरविलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता ११ मे रोजी नीता इंगोले नामक महिला हरविल्याची तक्रार राजापेठ ठाण्यात होती. त्यानुसार पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून मृत महिलेची ओळख पटवून घेतली. महिलेच्या मृतदेहाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अंदाजात महिलेची हत्या करून तिला पाण्यात टाकल्याचे निदर्शनास आले. माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने शोधकार्य सुरू केले. पोलिसांनी सर्वप्रथम पती दिलीप इंगोलेला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नीताचे दिलीपचा भाचा आकाश याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे नीता व दिलीप यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. आकाश हा नागपूर येथे राहत होता. एकदा नीता ही आकाशसोबत पळून गेली होती. दरम्यान पती-पत्नीच्या वादामुळे निता ही हमालपुरा येथील माहेरी राहायला गेली होती. ११ मे रोजी ती काही साहित्य खरेदीच्या अनुषंगाने घराबाहेर गेली व परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईने राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर निताचा सोमवारी सायंकाळी छत्री तलावाच्या पाण्यात मृतदेह आढळून आला. दरम्यानच्या काळात ही हत्या झाली आहे. हत्येनंतर मृतदेहाला दगड बांधून तलावात फेकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गुन्हे शाखेचे पथक दिलीप इंगोलेची कसून चौकशी करीत असून लवकरच सुगावा लागण्याची शक्यता आहे.पोलीस नागपूरला रवानाहत्येनंतर मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम मृत महिलेचा पती दिलीप इंगोलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने त्याचा नागपूर येथील भाचा आकाशचे पत्नीशी अनैतिक सबंध असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक आकाशला ताब्यात घेण्यासाठी नागपूर रवाना झाले आहे.