शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला आणायला गेलेल्या पित्याचा मृतदेहच सापडला

By admin | Updated: August 25, 2016 00:16 IST

२० आॅगस्ट रोजी मुलीला आणावयास गेलेल्या बेपत्ता वडिलांचा शेवटी मृतदेहच हाती आल्याने मोर्शी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांबद्दल रोष : जमाव ठाण्यावर धडकला, मोर्शी पोलिसांची हयगयच कारणीभूत असल्याचा मुलाचा आरोप मोर्शी : २० आॅगस्ट रोजी मुलीला आणावयास गेलेल्या बेपत्ता वडिलांचा शेवटी मृतदेहच हाती आल्याने मोर्शी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी या संदर्भात शेकडो महिला- पुरुषांचा जमाव पोलीस स्टेशनवर धडकल्याने काही काळाकरिता तणाव निर्माण झाला होता. स्थानिक मधुसुदननगर येथील रहिवासी दिलीप सोनारे (५०) यांची मुलगी रोशनी हिचा विवाह घाटलाडकी (सांभोरा) येथील भीमराव डांगे या युवकासोबत झाला होता. लग्न झाल्यापासून रोशनी हिचा नेहमीच शारीरिक व मानसिक छळ होत असून पैशाची मागणी होत असल्याची तक्रार तिने तिच्या आई-वडिलांकडे केली होती. शनिवार २० रोजी दुपारी रोशनी हिने आपल्याला बेदम मारहाण केल्याचे व आता आपण सासरी राहू इच्छित नसल्याचे तिच्या आई-वडिलांना कळविले. त्यावरुन तिचे वडी दिलीप सोनारे हे सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान मुलीला माहेरी आणण्याकरिता तिचे सासरी घाटलाडकी (सांभोरा) येथे रवाना झाले. याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान दिलीप यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याचे भ्रमणध्वनी करुन काही अज्ञात लोक मारहाण करीत असल्याचे व जंगलाच्या रस्त्याने घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यावरुन ऋषिकेशने काही नातेवाईकांशी संपर्क साधला व वडील हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या नातेवाईकांसमवेत घाटलाकडी (सांभोरा) येथे जावून ताबडतोब आपली बहिण रोशनी हिला मोर्शीला परत आणले. परंतु दिलीपचा शोध लागला नाही. बेपत्ता दिलीपचा शोध घेतला असता मंगळवारी ५.३० ते ६ वाजता दरम्यान दिलीपचा मृतदेह मध्यप्रदेशाच्या हद्दीत असलेल्या हिरादेही परिसरात एका विहिरीत आढळून आला. शनिवार २० रोजी मृताचा मुलगा ऋषिकेश व नातेवाईकांनी मोर्शी पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोर्शी पोलिसांनी तक्रार दाखल करुन न घेता घाटलाडकी हे ब्राम्हणवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने तुम्ही तिथे तक्रार दाखल करा, असे सांगितले. मोर्शी पोलिसांनी सदरघटनेची गांभीर्याने दखल घेतली असती तर आज माझे वडील जीवंत असते, असा आरोप मृताचा मुलगा, पत्नी व परिवाराने केला आहे. दिलीपचा मृतदेह सापडताच पोलिसांविरुद्ध तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना अटक करेस्तोवर मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका नातलगांनील घेतली. मोर्शी पोलीस स्टेशन परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. मोर्शीचे ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांनी कुटुंबाची समजूत घातली. (शहर प्रतनिधी)