शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेचा मृतदेह नेला तहसील कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:04 IST

श्रावण बाळ योजनेचे अनुदान न मिळाल्याने वृद्धेला उपचार करून घेता आले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू ओढवला. संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी अचलपूरहून मूळ गावी नेत असताना मंगळवारी वृद्धेचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून तासभर ठिय्या दिला. याप्रसंगी नायब तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देअनुदान नाही : नायब तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : श्रावण बाळ योजनेचे अनुदान न मिळाल्याने वृद्धेला उपचार करून घेता आले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू ओढवला. संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी अचलपूरहून मूळ गावी नेत असताना मंगळवारी वृद्धेचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून तासभर ठिय्या दिला. याप्रसंगी नायब तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.कलावती भगवान चोरपगार (७५, रा. सामदा) असे मृत महिलेचे नाव आहे. जानेवारी महिन्यापासून श्रावण बाळ योजनेचे अनुदान त्यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांना स्वत:वर उपचार करून घेता आले नाही. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना मुलीकडे अचलपूर येथे नेण्यात आले. तेथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी तिचे प्रेत अचलपूरहून त्यांचे प्रेत गावी आणत असताना प्रभाकर चोरपगार यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धेचे प्रेत तहसीलदारांच्या दालनात आणले. घोषणाबाजीमुळे एकच खळबळ उडाली. तहसीलदार अमोल कुंभार आंदोलनाची माहिती मिळताच दाखल झाले. सुनील चोरपगार, गोपाल चोरपगार, सतीश धावत, दिनेश चोरपगार आदी नातलगांनी यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अरविंद देशपांडे यांच्या निलंबनाशिवाय प्रेत नेणार नसल्याची भूमिका घेतली व तातडीने कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार अमोल कुंभार निवेदन दिले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनीही गर्दी केली. दालनात प्रेत तासभर होते. दरम्यान, सर्व बाबी तपासून पुढील कार्यवाही करू. अशाप्रकारे दालनात प्रेत ठेवणे उचित नाही. त्यावर अंत्यसंस्कार करावा, अशी विनंती तहसीलदार कुंभार यांनी आंदोलकांना केली.दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अरविंद देशपांडे यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. परंतु, निलंबनाचे अधिकार आम्हाला नसल्याचे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर म्हणाल्या. मात्र, आंदोलक लेखी पत्र द्या, या मागणीवर ठाम होते. यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या कामात दिरंगाई केल्याने नायब तहसीलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येत असल्याचे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कलावतीबार्इंच्या खात्यात आतापर्यंत १८०० रुपये जमा झाल्याची माहिती तहसीलदार कुंभार यांनी दिली. त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाल्याचे कळते. त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी आहे.श्रावणबाळ योजनेच्या कामात नायब तहसीलदार अरविंद देशपांडे हे दिरंगाई करीत असल्याने लाभार्थींना त्रास होत आहे. या आशयाचे पत्र यापूर्वीच उपजिल्हाधिकाºयांना पाठवले आहे.- अमोल कुंभारतहसीलदार, दर्यापूर