शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
3
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
4
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
5
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
7
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
8
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
9
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
10
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
11
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
12
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
13
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
14
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
15
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
16
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
17
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
18
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
19
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
20
दोन डबे साेडून एक्स्प्रेस धावली, दोनदा तुटले कपलिंग; ४० मिनिटे वाहतूक ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट

उद्यान बांधकामातील अनियमिततेवर बोट

By admin | Updated: February 8, 2017 00:06 IST

मनपाच्या बांधकाम विभागाने केलेल्या उद्यानविकासात अनियमितता झाल्याचे खळबळजनक निरीक्षण मनपाच्याच उद्यान विभागाने नोंदविले आहे.

शीतयुद्ध : उद्यान अधीक्षकांचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र प्रदीप भाकरे अमरावतीमनपाच्या बांधकाम विभागाने केलेल्या उद्यानविकासात अनियमितता झाल्याचे खळबळजनक निरीक्षण मनपाच्याच उद्यान विभागाने नोंदविले आहे. उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर यांनी यासंदर्भात कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांना पत्र पाठवून संबंधित उद्यानातील अनियमितता तपासण्याची सूचना केली आहे. या पत्राने बांधकाम आणि उद्यान विभागात शीतयुद्ध रंगण्याची दुश्चिन्हे आहेत. ३१ जानेवारीला हे पत्र पाठविण्यात आले असले तरी बांधकाम विभागामध्ये हे पत्र ४ फेब्रुवारीला पोहोचल्याची नोंद आहे. महापालिकेतील उद्यान विभागाने बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले आहे.सन २०१५-१६ वर्षातील १४ व्या वित्त आयोगातील २५ लाख १ हजार २३७ रूपयांच्या निधीतून शारदानगर प्रभागात उद्यान तयार करण्यात आले. हे काम मनपाच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आले. त्यामध्ये अनियमितता झाल्याचा अहवाल उद्यान अधीक्षकांना दिला आहे. उद्यानातील ‘हॉरी कल्टोन’ संबंधित कामांमध्ये बऱ्याच त्रुटी आढळून आल्याचे यापत्रात नमूद आहे. अंदाजपत्रकामध्ये लॉन ६०० चौरस मीटर असताना प्रत्यक्षात ५६८ चौरस मीटरमध्येच लॉन असणे, फ्लॉवर बेड ६० चौरस मीटरचे असताना प्रत्यक्षात ते ३०.९० चौरस मीटरमध्ये लावण्यात आल्याचे येवतीकरांनी केलेल्या तपासणीत नोंदविले गेले. ही अपूर्ण कामे पूर्ण करावी, अशी सूचना उद्यान विभागाकडून कार्यकारी अभियंत्यांना करण्यात आली आहे. ‘पार्क अ‍ॅन्ड गार्डन डीसीआर’च्या प्रत्यक्ष कामात खोदकाम खते व माती भरण्याचा अंतर्भाव असल्याची त्रुटी काढण्यात आली आहे. प्रत्यक्ष जागेवर फिलिंग दिसली नसल्याचे निरीक्षण येवतीकरांनी नोंदविले आहे. ‘ग्रीन जीम’च्या खरेदीमध्येही बांधकाम विभागाने घोळ घातल्याचा गंभीर आरोप यात करण्यात आला आहे. ‘ग्रीन जीम’ पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडून १० टक्के सुरक्षाकपात करण्यात आली नाही आणि संबंधिताला १२ टक्के ‘वॅट’ सुद्धा अधिक देण्यात आला. सोबतच वस्तुची दोन वर्षांची कोणतीही हमी घेण्यात आली नाही, असे निरीक्षण येवतीकर यांनी अधिकृत प्रशासकीय पत्रात नोंदविले आहे.शारदानगरातील उद्यानात झालेली अनियमितता तपासावी आणि त्रुटी दूर केल्यानंतरच ते उद्यान हस्तांतरित करुन घेण्यात येईल. याअनुषंगाने संबंधित कंत्राटदार व शाखा अभियंत्यांना आदेशित करावे, अशी सूचना या पत्रातून करण्यात आली आहे. पत्राचा सूर कुठेही विनंतीचा नाही. उद्यान पूर्णत्वास आल्यानंतर कंत्राटदाराला पुढील तीन महिने किंवा सौंदर्यीकरण होईपर्यंत निगा राखण्याचे कळवावे, अशी सूचना कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांना उद्यान अधीक्षकाकडून करण्यात आली आहे. येवतीकर यांनी पोतदार यांना कडक शब्दात पाठविलेल्या यापत्राने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.उपायुक्तांचा चर्चेचा शेरा उद्यान अधीक्षकाकडून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नावे पाठविलेल्या पत्राच्या प्रती आयुक्त आणि सामान्य उपायुक्तांना माहितीकरीता पाठविण्यात आल्या आहेत. यापत्रात उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे यांनी मूळ नस्ती व संबंधित कंत्राटदारासह तसेच मेजरमेंट बुकसह चर्चा करावी, असा शेरा दिला आहे. मात्र, निवडणुकीतील व्यस्ततेमुळे याविषयावरील चर्चा प्रलंबित आहे.शारदानगर प्रभाग उद्यानातील अनियमिततेबाबत कार्यकारी अभियंत्याना कळविण्यात आले आहे. तसे पत्र त्यांना ३१ जानेवारीला देण्यात आले. मात्र, निवडणुकीतील व्यस्ततेमुळे याप्रकरणी चर्चा होऊ शकली नाही.- प्रमोद येवतीकर, उद्यान अधीक्षक, महापालिका