शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

धारणीत सर्व १० जागांवर फुलले कमळ

By admin | Updated: May 27, 2017 00:04 IST

स्थानिक पंचायत समिती निवडणुकीत भाजपने सर्व दहा जागांवर विजय मिळविला.

पंस निवडणूक : मावळत्या सभापती दोन्ही जागांवर पराभूतलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : स्थानिक पंचायत समिती निवडणुकीत भाजपने सर्व दहा जागांवर विजय मिळविला. माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली गेली. पंचायत समिती सभापती सुनीता पटेल यांनी दोन जागा लढविल्या होत्या. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांना पराजयाचे तोंड पहावे लागले. राकाँच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढविली. दहा जागांसाठी २४ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येथे दहा गटांत एकूण ३२ उमेदवार रिंगणात होते. मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपमध्ये पुन:प्रवेश केल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. यातच त्यांच्या पत्नी सुनीता या राकाँच्या उमेदवार असल्याने तालुक्यांत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, भाजपने सर्व पक्षांना क्लिन स्विप दिल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कुटुंगा गटातून सुनीता काडमा मोरले यांनी ४२२ मतांनी विजय मिळविला. त्यांनी काँग्रेसच्या सागरबाई धिकार व शिवसेनेच्या शांती ठाकरे यांचा पराभव केला. हरिसाल येथून रामविलास दहिकर यांनी बाजी मारली. त्यांंनी काँगे्रसचे सोहन कास्देकर यांचा ११२८ मतांनी पराभव केला. दुनी येथून भाजपचे तारासिंग कास्देकर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या शालिकराम जांबेकर यांच्यावर ११०९ मतांनी मात केली. दिया येथून बाबूलाल मावस्कर २९६५ मते घेऊन विजयी झालेत. गोंडेवाडी गटातून माधुरी जावरकर विजयी झाल्यात. त्यांना २४९४ मते मिळालीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनीता पटले यांचा पराभव केला. शिरपूरमधून भाजपच्या सुलोचना जांब यांनी कुसुमलता पटेल यांचा पराभव केला. टिटवा मतदारसंघातून राजकुमार पटेल यांचे पूत्र रोहित पटेल निवडून आलेत. त्यांनी रामगोपाल मावस्कर यांचा ९४६ मतांनी पराभव केला. मोगर्दा गटातून जगदीश हेकडे यांनी काँग्रेसचे शंकर पाटील यांचा ४४१ मतांनी पराभव केला. राणीगाव गटातून बिंदिया जावरकर यांनी काँग्रेसच्या रेखा जावरकर यांचा पराभव केला. बिंदिया जावरकर यांना २,८२६ मते मिळाली. सावलीखेडा गणातून जया वसू यांनी शिवसेनेच्या शांता बेठेकर यांचा पराभव केला. येथून निवडणूक लढविणाऱ्या मावळत्या पंस सभापती सुनीता पटेल यांना केवळ ५८५ मते मिळाली.पटेलांचा ‘राजकुमार’ सभापतिपदी !धारणी पंचायत समितीच्या विजयाचे शिल्पकार माजी आमदार राजकुमार पटेल मानले जात आहेत. पैकीच्या पैकी जागा निवडून आणल्याने पंचायत समितीच्या सभापतीपदी राजकुमार पटेल यांचे सुपूत्र रोहित यांची निवड होण्याची शक्यता आहे. मावळत्या पंचायत समितीमध्ये राजकुमार पटेल यांच्या पत्नी सुनीता सभापती होत्या.