शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:42 IST

लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय व वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा सामाजिक उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय व वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय खाजगी संस्था, समाजसेवक, सामाजिक-राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत समूहातर्फे करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोरगरीब रुग्णांना रक्तपुरवठा उपलब्ध करून देण्याची संधी चालून आलेली आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे ९९२२४२७७९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रक्तदाता संघाचे आयोजनवरुड : श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघ आणि लोकमत परिवार, सखी मंच, वरुड यांच्यावतीने २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन रक्तदाता संघ व ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९३७६०२ या क्रमांकावर संपर्क करावा.