लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात महिनभरापासून कोरोनाचा संसर्ग माघारला असतानाच आरोग्य यंत्रणेद्वारा तिसऱ्या लाटेचा अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा महिनाभर निर्बंध वाढविण्यात आले. आता बुधवारपासून यामधून मुक्तता झाली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मेअखेरपर्यंत जिल्ह्यात ७२ हजारांवर संक्रमितांची नोंद झाली. १२१९ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. कोरोनाच्या डेल्टा या विषाणूमुळेच संक्रमण वाढले. विषाणूपेक्षा याचे संक्रमण गतिशील असल्यामुळे जिल्ह्यात गहजब झाला होता. जिल्हा सीमेवरील नागपूर, यवतमाळ, अकोला व मध्य प्रदेशातून रुग्ण अमरावतीला उपचारार्थ आलेत. यासोबतच त्यांचे नातेवाईकही असल्याने डेल्टाचा संसर्ग जिल्ह्यात वाढला होता, ही वस्तूस्थिती आहे.
कॉन्टॅक्ट ट्र्रेसिंगकोरोनाचा संसर्ग कमी होताच आरोग्य विभागाने उसंत घेतल्याने अलीकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये काही प्रमाणात कमी आलेली आहे. मात्र, शासनाद्वारा तिसऱ्या लाटेचा अलर्ट जाहीर केल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलेले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार किमान एका रुग्णामागे किमान १० जणांशी संपर्क केला जात आहे.
कोठे, काय घेतली जातेय दक्षता
- बसस्थानक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे बससेवा सुरु करण्यात आली. सुरुवातीला ५० टक्के, तर आता पूर्ण क्षमतेने सेवा सुरू आहे. बसस्थानकावर फारशी दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून आले.
- वेलकम पाईंट : सायंकाळ झाल्यानंतर येतील वेलकम पाॅइंटवर प्रवाशांची गर्दी होते. या ठिकाणी अनेकांना मास्क नसतानाही महापालिका प्रशासनाद्वारा कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.
- रेल्वे स्थानक : येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काही प्रमाणात उल्लंघन होत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वेस्थानकावर फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
- बाजारपेठ : राजकमल, जयस्तंभ, राजापेठ जवाहर गेट आदी भागातील व्यापारी संकुल व दुकांनामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन अभावानेच होताना दिसत आहे.
ग्रामीण भागावर अधिक लक्षकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक संक्रमण ग्रामीण भागात झाले होते. त्यामुळे यावेळी दुसऱ्या लाटेतील हॉटस्पॉट तालुक्यांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात नोंद झालेले ५५ टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांमध्ये १० टक्के अधिक क्षमतेने बेड वाढविण्यात आलेले आहे. याशिवाय काही बेड ऑक्सिजनचेदेखील असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.