शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

महामार्गावर भाजपचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

अमरावती : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रखडले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १५ महिन्यानंतरही आयोगाची स्थापन न ...

अमरावती : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रखडले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १५ महिन्यानंतरही आयोगाची स्थापन न केल्यामुळे या आरक्षणाचा गळा घोटला गेल्याचा आरोप करीत शहर भाजपाद्वारा शहराध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात शनिवारी रहाटगाव चौकालगत महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात रवींद्र खांडेकर, सचिन रासने, रविराज देशमुख, कुसूम साहू, संध्या टिकले, गजानन देशमुख, दीपक खताडे, विवेक चुटके, योगेश वानखडे, संजय तिरथकर, सुनील साहू, सुरेखा लुंगारे, रिता मोकलकर, गंगाताई खारकर, आत्माराम पुरसवाणी, श्रद्धा गेहलोत, सतीश करेसीया, भारत चिखलकर, वंदना मडगे, सुनील जावरे, इंदू सावरकर, पंचफुला चव्हाण, निकिता पवार, मिलिंद बांबल, प्रकाश सरदार, राजेश गोयंका, कौशिक अग्रवाल, राजेश पड्डा, आशिष अतकरे, सागर महल्ले, अंकित जैन, अतुल तिरथकर, अजय सारस्कर, कुणाल टिकले, संजय आठवले, लखन राज, प्रवीण वैश्य, हेमंत श्रीवास, शिवम देशमुख, जितेंद्र भुजबळ, बाबासाहेब मारोडकल, जगदीश कांबे, अमोल गाडगे, रऋषीकेश काळबांडे, राजेश पोहणकर, स्वप्निल साटोटे, राज सगणे, किरण देशपांडे, उन्नती शालिग्राम, सुषमा कोठीकर, वनमाला सोनावणे, शिल्पा पाचघरे, शितल वाघमारे, सुभाष श्रीखंडे, दिपक दादलाणी, राजू पाठक, अविनाश देऊळकर, संजय पांडे, सुरेंद्र बुरंगे, अखिलेश खडेकार, सिद्धेश देशमुख आदी सहभागी होते.

बॉक्स

अकोला टी पाईंटवरही रस्तारोको

याच मागणीसाठी बडनेराच्या अकोला, पाळा टी पाईंटवर महापौर चेतन गावंडे, शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यामध्ये खोंडे, विनय नगरकर, मीना पाठक, छाया अंबाडकर राजेश कीटुकले, वीरेंद्र ढोबळे, राजू मेटे, किरण पांडे, गजानन तरेकर, मनीष कुठे, गंगा अंभोरे, अनिता राज, पद्मजा कौंडण्य, सतनाम कौर हुडा, पूजा जोशी, उमेश नीलगीरे, प्रवीण कौंडण्य, प्रकाश डोपे, राहुल जाधव, भारती डेहनकर, शिवाजी आवटे, कार्तिक सामदेकर, लखन राज, ममता चौधरी, बरखा बोजे, रुपेश दुबे, अमृत यादव, शुभम वैष्णव, श्याम साहू, जयेश गायकवाड, सौरभ किटुकले, देवांगणा लकडे, किरण आंबाडकर, गजेंद्र भैसे, संजय कटारीया आदी सहभागी होते. सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक व नंतर सुटका केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरत दीड तास ठिय्या आंदोलन केले. प्रचंड घोषणाबाजी करीत भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या या निर्णयाचा यावेळी जाहीर निषेध केला. यावेळी महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची विनवणी केली. मात्र, आंदोलनकर्ते महामार्गावरून हटण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बळजबरीने वाहनांमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणले. यावेळी भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. प्रत्यक्ष स्थळ माहीत नसल्याने तसेच आंदोलकांकडून हिंसक कृती घडू नये, यासाठी पोलीस कर्मचारी सकाळपासून पोलीस मार्गावर होते. भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत शेगोकार, भाजयुमोचे प्रदेश सदस्य विशाल केचे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित राठोड, भाजप तालुकाध्यक्ष राजू चिरडे यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठ बस स्टँडवर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कार्यकर्त्यांच्यावतीने महाविकास आघाडीविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, तर सरकारच्या या काळ्या निर्णयाचा निषेधदेखील यावेळी करण्यात आला. जोवर हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना वाहनात बसवून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी गजानन डहाके, दीपक घोगरे, सुनील बिजवे, अक्षय कव्हाने, उदय देऊळकर, संजय धनसुईकर, राजू वानखडे, मंगेश आवारे, रमेश दिवे, सचिन मोहकार, रोशन पुनिया, सचिन भाकरे, अतुल बनसोड, प्रल्हाद पटके, विलास हळवे, नितीन वैष्णव, चंद्रशेखर सुंदरकर, अनंता खरुले, गोपाल पोकळे, उमेश डोईफोडे, संजय पकडे, नीलेश रघुवंशी, गजानन राणे, अजय गोरले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची सुटका केली.