शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

अचलपूरच्या परकोट, दरवाजे, हौज कटोऱ्यावर केंद्र शासनाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:10 IST

अचलपूर शहरातील परकोट, दरवाजे व हौज कटोऱ्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाची मोहोर लागली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा : इजा पोहोचवल्यास दोन वर्षे कैद

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर शहरातील परकोट, दरवाजे व हौज कटोऱ्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाची मोहोर लागली आहे.ऐतिहासिक व प्राचीन वस्तूंना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. शहरातील परकोटसह दुल्हा गेट, हिरापुरा गेट, जीवनपुरा गेट आणि हौज कटोरा या वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या वास्तूंचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे सोपविली आहे. त्यांची हानी, स्वरूपात बदल, विद्रुपीकरण वा दुरुपयोग याकरिता दोन वर्षे कारावास किंवा एक लाखाचा दंड अथवा दोन्ही शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.अचलपूरच्या या पाचही वास्तूंवर लक्ष ठेवण्याकरिता पाच स्वतंत्र चौकीदारांची नियुक्ती पुरातत्त्व विभागाने केली आहे. देशपातळीवरील ऐतिहासिक स्थळांप्रमाणेच येथील स्थळांची विकासकामे पूर्णत्वास नेली जात आहेत. सिलीगुडी येथील पेव इनफ्रास्ट्रक्चर ही कंपनी अकोला, नागपूर, दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ही कामे पूर्णत्वास नेत आहे. याकरिता लागणारा खास दगड सिलीगुडीची ही कंपनीच पुरवित आहे. ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या जुन्या दगडांशीच मिळताजुळता हा दगड आहे.शहराच्या चहुबाजूने असलेल्या परकोटाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यास अतिक्रमणाने ग्रासले आहे. केवळ ५ ते ६ किलोमीटर लांबीचाच परकोट शिल्लक आहे. हौज कटोरा नामक अष्टकोणी वास्तूची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. परकोटला दोन्ही बाजूने आणि हौज कटोरालगत आवारभिंत मजबूत अशा लोखंडी रेलिंगसह उभारण्यात आली. ‘आपण नवाब इस्माईलखानचे तट आणि दरवाजे ह्या संरक्षित स्मारकाच्या २०० मीटर विनियमित सीमेत आहात’ याची जाणीव तेथील फलक करून देत आहेत. सीमेची जाणीव करून देणारा वेगळा फलक हौजकटोरा येथेही लावण्यात आला आहे. पडझड झालेल्या वास्तूंची दुरुस्ती टप्प्याटप्प्याने पुरातत्त्व विभाग करणार आहे.भारतीय पुरातत्त्व विभागाचे लागले फलकसंरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमेपासून २०० मीटर पर्यंतचा भाग विनियमित क्षेत्र म्हणून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात बांधकाम व तत्संबंधी कार्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे फलक त्या त्या ठिकाणी पहिल्यांदाच लावण्यात आले आहेत. या वास्तूलगतच्या परिसरात पर्यटकांकरिता पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व अन्य आवश्यक बाबी पूर्णत्वास नेण्यास भारत सरकारने विभागाला सुचविले आहे.