अमरावती : अंध माकडाला पकण्यासाठी शिकारी प्रतिबंधक विभागाने चांदूररेल्वेतील आझाद चौकात मंगळवारी दुपारी रेस्कू आॅपरेशन चालविले. वनविभागाने माकडाला टॅग्यूलाईज करुन जंगलाच्या सानिध्यात सोडले.आझाद चौकातील रहिवासी दिनेश दुर्गे यांच्या घराजवळ एका माकडाने ठिय्या दिला होता. माकडाच्या समूहातून भरकटलेले हे माकड अंध असल्याने ते आक्रमक वर्तणूक करीत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. माकडाने आझाद चौकातील एका वृक्षावर ठिय्या मांडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. याची माहिती दिनेश दुर्गे यांनी वनविभागाला दिली. त्या आधारे मंगळवारी वनविभागाचे पथक चांदूरेल्वेला रवाना झाले. वनविभागाच्या उपवनसंरक्षक निनु सोमराज यांच्या मार्गदर्शनात शिकारी प्रतिबंधक विभागातील पी. टी. वानखडे, अमोल गावनेर, फिरोज खान, सतीश उमक, मनोज ठाकुर, चंदु ढवळे, अमीत शिंदे, वीरेंद्र उज्जैनकर यांनी दुपारी आझाद चौकात रेस्क्यू आॅपरेशन सुरु केले असता बघ्याची गर्दी जमली होती. अर्धा तासांत रेस्क्यू पथकाने माकडाला टॅग्युलाईज करुन बेशुध्द केले. माकडाला पिंजऱ्यात टाकून जंगलात सोडण्यात आले आहे.
अंध माकडासाठी ‘रेस्क्यूआॅपरेशन’
By admin | Updated: March 19, 2015 00:16 IST