शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकलिस्टेड ‘इसराजी’चा राजकीय खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 00:07 IST

रामपुरी कॅम्प परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ‘इसराजी’ या साफसफाई कंत्राटदार संस्थेच्या प्रमुखाने ...

आयुक्तांची भेट : कारवाई टाळण्यासाठी अर्थकारण लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रामपुरी कॅम्प परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ‘इसराजी’ या साफसफाई कंत्राटदार संस्थेच्या प्रमुखाने मंगळवारी पुन्हा एकदा आयुक्तांची भेट घेऊन ब्लॅकलिस्ट कारवाई मागे घेण्याची विनंती केली. एका बड्या नगरसेवकाला इसराजीने हाताशी धरले असून यात मोठे अर्थकारण होत असल्याचा आरोप महापालिका वर्तुळातून होत आहे. काळ्या यादीत टाकण्याने आपले भविष्य टांगणीला लागेल. त्यामुळे ही कारवाई मागे घेण्याची विनंती त्याने आयुक्तांकडे केली. इसराजी’वर केलेली ब्लॅकलिस्टची कारवाई मागे घेण्याचा आदेश प्रशासनाने दिला, तर प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह लागणार आहे.महापालिकेतील एका ज्येष्ठ नगरसेवकाने मंगळवारी पुन्हा एकदा आयुक्तांचे दालन गाठून ‘इसराजी’वर केलेली ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई प्रशासनाने मागे घ्यावी, अशी विनंती केली. मात्र आयुक्तांनी इसराजीवरील कारवाई शिथिल करण्याचा चेंडू पुन्हा अतिरिक्त आयुक्तांकडे टोलविला आहे. २५ मार्चला आयुक्तांनी ‘मान्य’ असा शेरा दिल्यानंतर ३० मार्चला अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीने इसराजी बहुउद्देशीय संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले. ३१ मार्चपासून इसराजीचा रामपुरी कॅम्पमधील दैनंदिन साफसफाईचा कंत्राट रद्द करण्यात आला. २ एप्रिलला आदेश मिळाल्यानंतर ‘इसराजी’ संस्थेच्या प्रमुखांनी कारवाई टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले. ब्लॅकलिस्ट केल्यास अन्य ठिकाणचे कंत्राट आपोआप रद्द होईल. त्यामुळे काळ्या यादीत टाकण्याची कारवाई न करता केवळ रामपुरी कॅम्पमधील कंत्राट रद्द करावा, या मागणीसाठी इसराजीच्या प्रमुखाने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, एमओएच अशा सर्वांची उंबरठे झिजविले.मात्र कुठेही दाळ शिजत नसल्याचे पाहत इसराजीच्या प्रमुखाने पुन्हा त्या बड्या नगरसेवकाला हाताशी धरण्याचा खटाटोप चालविला आहे. विशेष म्हणजे महापौरांनी बोलाविलेल्या स्वच्छताविषयक बैठकीत आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांसह स्वच्छता कंत्राटदारांना धारेवर धरून अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी दिली होती. त्याचवेळी महापौर संजय नरवणे यांनी त्यांच्याच रामपुरी कॅम्प भागातील इसराजी या साफसफाई कंत्राटदारांबद्दल तक्रार केली होती. त्याअनुषंगाने इसराजीला काळ्या यादीत टाकण्याची संचिका चालविण्यात आली. आयुक्तांनी अनुकुलता दर्शविल्याने अतिरिक्त आयुक्तांनी ईसराजीला काळ्या यादीत टाकण्यासह त्यांचे कंत्राट रद्द करीत असल्याचे आदेश पारित केले होते. त्यापासून ती कारवाई मागे घेण्यासाठी इसराजीने साम दाम दंड भेद ही नीति अवलंबून प्रशासनाला घायकुतीस आणले आहे.त्या नगरसेवकाची दुटप्पी भूमिका एकीकडे शहरातील वाढत्या अस्वच्छतेबाबत आमसभेत प्रशासनाने वाभाडे काढायचे आणि त्याचवेळी महापालिकेने केलेली कारवाई चुकीची ठरवत ती मागे घेण्यासाठी प्रशासनाला भाग पाडायचेॅ, अशी दुटप्पी भूमिका यानिमित्ताने उघड झाली आहे. कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांचे आपण मुक्तीदाते आहोत, या आविर्भावात महापालिका प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करायचा आणि आपली कामे काढून घ्यायची, असा नवा शिरस्ता यानिमित्ताने पडू लागला आहे.- तर त्याला मोकळे रान साफसफाईच्या नावावर महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारायचा, एका एका देयकापोटी महिन्याकाठी अडीच ते तीन लाख रुपये घ्यायचे असा अनेक साफसफाई कंत्राटदारांचा शिरस्ता आहे. त्याअनुषंगाने स्वच्छतेच्या कामात हयगय करणाऱ्या इसराजीवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. मात्र ती कारवाई रद्द करावी, यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. राजकीय दबावाला बळी पडत इसराजीवर करण्यात आलेली ब्लॅकलिस्टची कारवाई मागे घेतल्यास आपण प्रशासनाला वाकवू शकतो आणि महापालिकेत ‘दाम’ दिल्यास काहीही शक्य आहे, असा संदेश गेल्यास वावगे वाटू नये.