शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काळे उंदीर भारतातूनच जगभरात पसरले, प्राध्यापकाला संशोधनातून दिसले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 19:16 IST

अमरावतीच्या प्राध्यापकाचे संशोधन : सिंधू संस्कृतीपासून व्यापार, जहाजातून देशोदेशी प्रसार 

अमरावती : भल्याभल्यांची भंबेरी उडविणारे काळे उंदीर भारतातूनच समुद्रमार्गे जगभरात पसरले आहेत. विशेष म्हणजे, सिंधू संस्कृतीच्या काळापासून व्यापारी मालाच्या जहाजातून त्यांचा प्रवास झाला आहे. जगभरातील काळ्या उंदिरांच्या डीएनए संशोधनातून ही बाब अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचे प्रा.डॉ. मुमताज बेग यांनी पुढे आणली आहे. 

‘काळ्या उंदरांचा उगम व प्रसार’ या विषयावरील शोधनिबंधात प्रा.डॉ. मुमताज बेग यांनी सदर नोंदी घेतल्या आहेत. हा शोधनिबंध स्वित्झर्लंड येथील स्प्रिंगर नेचर पब्लिकेशन हाऊसच्या बायोलॉजिकल इन्व्हिेशन या प्रतिष्ठित त्रैमासिकात सप्टेंबर 2018 मध्ये प्रसिद्ध झाला. जागतिक पातळीवर चौदाव्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या कार्नेल विद्यापीठात ते 2015 मध्ये संशोधनाकरिता भारत सरकारची फेलोशिप मिळवून दाखल झाले होते. त्यानंतर तेथील संशोधक प्रा.डॉ. जेरेमी सिअर्ल यांच्या सहकार्याने त्यांनी संशोधन पूर्ण केले.   शोधप्रबंधानुसार, भारतात मुख्यत: दोन प्रकाराचे उंदीर आढळतात. एका सहज आढळणाऱ्या प्रजातीत 38 गुणसूत्रे आणि दुसऱ्या कमी आढळणाऱ्या प्रजातीत 42 गुणसूत्रे आहेत. ते गंगा नदी व पूर्वेकडील भागात आढळतात. ते 38 गुणसूत्रे असलेल्या उंदरांचे पूर्वज आहेत. आठ हजार वर्षांपूर्वी भारतातील उपखंडातील उत्तर पश्चिम भागात मानवाने शेती करण्यास सुरुवात केली. याच भागात अतिप्राचीन समृद्ध हडप्पा, सिंधू संस्कृती उदयास आली व तेथील उत्पादने मेसोपोटेमियासह जगाच्या विविध भागांत व्यापारमार्गे पोहोचली. त्यासोबतच संस्कृतीचे आदान-प्रदान झाले आणि महत्त्वाचे म्हणजे भारतातील काळ्या उंदरांनी या भागात प्रवेश घेतला. तेथेदेखील त्यांनी हवामानाशी जुळवून घेतले. हडप्पा संस्कृतीच्या अवशेषात आढळलेले उंदरांचे नमुने आणि त्यांचे विविध देशांत पसरलेले वंशज यांच्या डीएनए चाचणीतून त्यांची वंशावळ एकच असल्याचे प्रा.डॉ. मुमताज बेग व प्रा.डॉ. जेरेमी सिअर्ल यांनी सिद्ध केले. 

जहाजातून देशभरात पोहचले उंदीरव्यापारासाठी होणाºया जहाजाच्या वाहतुकीतून काळे उंदीर हे भारतातून आग्नेय आशिया, अरब द्वीपकल्प (ओमान), अरब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून भूमध्य सागरी प्रदेशातील फ्रान्स, इटली आणि अल्बेरीयन प्रदेश (स्पेन, पोर्तुगल) येथे पोहोचले. पंधराव्या शतकात भारताला भेट देऊन परतणाºया युरोपीयनांच्या जहाजातून उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपातील इतर भागांत काळे उंदीर पोहोचले. 

अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने संशोधन पूर्ण झाले. जगभरात दिसणारे काळे उंदीर भारतातूनच तेथे दाखल झाले आणि तेथील परिस्थितीशी जुळवून घेत आपले अस्तित्व दाखवित आहेत. प्रा. डॉ. जेरेमी सिअर्ल, संस्थेचे संचालक डॉ. एस.जी. गुप्ता यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.- प्रा.डॉ. मुमताज बेग, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती