शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

विद्यापीठात ‘गाला’ काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:37 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साहित्य, वस्तू पुरवठादार येथील गाला एन्टरप्रायजेसला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी घेतला. यापुढे ‘गाला’कडून कोणत्याही प्रकारचा पुरवठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट पदवी पाकीट प्रकरण : व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साहित्य, वस्तू पुरवठादार येथील गाला एन्टरप्रायजेसला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी घेतला. यापुढे ‘गाला’कडून कोणत्याही प्रकारचा पुरवठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहे. गतवर्षी विद्यापीठात पदवी पाकीट निकृष्ट दर्जाचे पुरवठा करण्यात आले होते, हे विशेष.विद्यापीठात गतवर्षी पदवी पाकीट खरेदीचा निर्णय झाला. त्यानुसार भांडार विभागातून ही प्रक्रिया राबविली गेली. पाकीट खरेदी करताना कागदाचा जीएसएम दर्जा एक्स्पर्ट समितीने ठरवून दिला होता. तथापि, भांडार विभागाने ई-निविदेअंती १४० ऐवजी ९१ जीएसएम कागदाचे पाकीट खरेदी केले. मात्र, हे पाकीट निकृष्ट दर्जाचे निघाले. ही बाब विद्यापीठाच्या क्रय समितीने सिद्ध केली. मात्र आतापर्यंत गाला एन्टरप्रायजेसविरुद्ध कारवाई केली नव्हती. मात्र, २५ मार्च रोजी झालेल्या क्रम समितीसमोर पडदे, कारपेट आणि इतर साहित्याच्या दराला मान्यता देण्याविषयी प्रस्ताव ठेवला होता. गाला एन्टरप्रायजेसच्या दरांना मान्यता न देता तो फेटाळला. क्रय समितीने गाला एन्टरप्रायजेसकडून पुरविलेले साहित्य चांगल्या दर्जाचे नाहीत, असा ठपका ठेवला. त्यामुळे क्रय समितीने गाला एन्टरप्रायजेसला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.अन्य खरेदी प्रकरणांची चौकशी केव्हा?विद्यापीठ वस्तू, साहित्य अन्य खरेदी करताना भांडार विभागातून प्रवास करावा लागतो. दरवर्षी लाखोंची खरेदी होत असताना त्या वस्तू, साहित्याचा दर्जा कोण तपासणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पदवी पाकीट विद्यार्थ्यांच्या हाती पडल्यानंतर त्याच्या दर्जाबाबत चर्चा झाली. यात सिनेट, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीही दखल घेतली. त्यामुळे पदवी पाकीटचा दर्जा समोर आला. मात्र, भांडार विभागातून अन्य साहित्य खरेदीविषयी कोण दखल घेणार, हा प्रश्न पडला आहे.१,0७,१८० रूपयांची कपातगाला एन्टरप्रायजेसच्या कंत्राटानुसार ४८ आठवड्यांसाठी ४६ हजार ३२० रूपये एवढी रक्कम ठरविली होती. मात्र, या फर्मने बाहेरील एजन्सीकडून पाकिटांची छपाई केल्याने पाकीट छपाईच्या बिजकाच्या रकमेतील फरकांची रक्कम ५७ हजार आणि पाकीट छपाईच्या रकमेवरील आयकरांची केलेली कपात तसेच परत न केलेली ३,८६० रुपये असे एकूण १ लाख ७ हजार १८० रुपयांची कपात करून देयके दिली. यापूर्वी गाला एन्टरप्रायजेसने पुरविलेल्या ट्रॅकसूटमधील देयकांतून ही रक्कम कपात केल्याची माहिती आहे.