शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

राणा यांच्या कार्यालयावर भाजपचा हल्ला

By admin | Updated: April 16, 2016 00:02 IST

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याबद्दल जाहीर कार्यक्रमातून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ...

पोलीस ठाण्यात आमदारांचा ठिय्या : पालकमंत्र्यांविरुद्धच्या वक्तव्याला हिंसक प्रत्युत्तरअमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याबद्दल जाहीर कार्यक्रमातून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आ. रवि राणा यांच्या राजापेठ परिसरातील जनसंपर्क कार्यालयावर हल्ला केला. खुर्च्यांची फेकाफेकी, दगड-विटांचा मारा करून आ. राणा यांच्या दोन वाहनांची तोडफोडदेखील करण्यात आली. राणा समर्थकांनीही हिंसक प्रत्त्युत्तर दिले. ही धुमश्चक्री तब्बल अर्धातास सुरू होती. आ. राणा स्वत: जनसंपर्क कार्यालयात असतानाच हा प्रकार घडला. यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एक दिवस आधी म्हणजे १३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजतानंतर भीमटेकडीवर नव्याने उभारलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राणा दाम्पत्याने केले. यावेळी केलेल्या भाषणात आ. रवि राणा यांनी पालकमंत्री पोटे यांच्यावर टीका करताना ‘कानाखाली मारेन’, अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. ती क्लिप नंतर व्हायरल झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शासकीय यंत्रणेने परवानगी दिली असताना पालकमंत्र्यांनी त्यात खोडा घातल्याचा आरोपही राणांनी केला होता. जय भीमच्या गर्जनाअमरावती : ‘बाबासाहेबांबद्दल राजकारण करुन आमच्या जखमेवर मीठ चोळाल तर कानाखाली आवाज काढेन’, असा खरमरीत इशारा आ. राणा यांनी भरसभेत पालकमंत्र्यांना दिला होता. या आशयाचे वृत्त शुक्रवारी बहुतांश वृत्तपत्रातून प्रकाशित होताच भाजप कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. राणांच्या या कृतीचा निषेध नोंदविण्याकरिता सकाळी १० वाजतापासूनच भाजप आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजापेठस्थित भाजप कार्यालयात जमले. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष विवेक कलोती, किरण पातुरकर, अनिल आसलकर, राजू कुरील, लविना हर्षे आदींच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक बैठक घेतली. यामध्ये पालकमंत्री पोटे यांच्याबद्दल आ. राणा यांनी केलेल्या व्यक्तव्यावर मंथन करण्यात आले. त्यानंतर राणांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी राणांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी आ. राणा यांचे जनसंपर्क कार्यालय गाठले. संतप्त भाजप कार्यकर्ते यावेळी ‘रवी राणा मुर्दाबाद, बाहेर काढा, बाहेर काढा, रवी राणा यांना बाहेर काढा’, अशा घोषणा देत होते. सोबतच ‘पालकमंत्री प्रवीण पोटे जिंदाबाद’चे नारे देत होते. भाजप कार्यकर्त्यांनी राणांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करताच युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव वाढला. दरम्यान आ. राणांच्या कार्यालयात बंदोबस्तासाठी तैनात दोन-चार पोलिसांनी हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त कार्यकर्त्यांचा आवेश पाहून ते अपुरे पडले. दोन्ही गटांनी परस्परविरोधी नारेबाजी सुरु केली. त्यातच राणांच्या दिशेने एका भाजप कार्यकर्त्याने बुट भिरकावला आणि त्यानंतर एकमेकांवर विटा, दगडांचा वर्षाव केला. कार्यालयातील राणांच्या पोस्टरला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. काहींनी खुर्च्यांची फेकफाक सुरू केली. एकमेकांवर खुर्च्या फेकण्याचा प्रकार सुरु असताना भाजयुमोचे अध्यक्ष विवेक कलोती यांच्या डोक्यावर एक खुर्ची आदळली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली. रक्त वाहू लागले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस ताफ्याने काही वेळानंतर भाजप कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. पश्चात पोलीस उपायुक्त नितीन पवार हे राणा यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी आ. राणा प्रसार माध्यमांसमोर या प्रकरणाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर आगपाखड करीत असताना कार्यालयाच्या दर्शनी भागेच्या काचेवर एक दगड येऊन आदळला. त्यामुळे काच फुटली आणि पुन्हा गोंधळ उडाला. यानंतर राणांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत. स्वत: आ. राणा यांनी कार्यकर्त्यांना बोलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले होते. थोड्याच वेळात आ. राणा यांनीदेखील त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलीस ठाणे गाठून पालकमंत्री पोटे यांच्यासह हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रेटून धरली होती.युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांवर गुन्हेशुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भाजपचे विलासनगरचे कार्यकर्ते मनीष करेसिया यांच्या तक्रारीवरुन युवा स्वाभिमानचे विनोद गुहे, अविनाश काळे, अनुप अग्रवाल, अभिजीत देशमुख, शुभम उंबरकर व २५ कार्यकर्त्यांविरुध्द कलम १४३, १४७, १४९, ३३६, ५०४ भादंविसह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.