अमरावती : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिग शोषण केल्याचा आरोप करून मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सोमवारी जिल्हा व शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदन देतेवेळी भाजपा महिला माेर्चाच्या अध्यक्षा अर्चना पखान, रूपाली नाकाडे, शिल्पा पाचघरे, रामकली वैष्णव, विजया ठवकर, ललिता चव्हाण, शुभांगी पाटणकर, विद्या घडेकर, मेघना देशमुख, शीला सगणे, पदमा तराळे, वर्षा काळमेघे, याशिवाय शहर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा लता देशमुख, उपमहापौर, संध्या टिकले, सुरेखा लुंगारे, ममता चौधरी, वैशाली आरोकर, बबिता शर्मा, स्वाती कुलकर्णी, पदमजा कौडण्य, सुंनदा खरडे, किरण देशमुख, अनिता राज, अर्चना पुंड, गंभा अंभोरे, सविता ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.