शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप विरुद्ध भाजप’

By admin | Updated: May 17, 2017 00:11 IST

दैनंदिन साफसफाईसाठी प्रभागनिहाय वेगवेगळे कंत्राटदार न नेमता पूर्ण शहरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याच्या ....

आयुक्तांना पत्र : सत्ताधीशांमध्ये स्वच्छता कंत्राटावरून रणकंदनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दैनंदिन साफसफाईसाठी प्रभागनिहाय वेगवेगळे कंत्राटदार न नेमता पूर्ण शहरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याच्या प्रस्तावावरून महापालिकेत ‘भाजप विरुद्ध भाजप’ अशी लढाई रंगली आहे. स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय हे या कंत्राटाबद्दल प्रचंड आग्रही असताना या ‘वन मॅन क्रॉन्ट्रक्टशिप’ला भाजपच्या बहुतांश नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. सत्ताधीशांमध्ये या कंत्राटावरून लढाई रंगल्याने विरोधी पक्षाचा सूर अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी एकच कंत्राटदार नेमण्याचा मुद्दयावर महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे.स्वच्छतेसाठी एक कंत्राटदार नेमण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आमसभेत येणार असल्याने प्रशासनानेही सावध पवित्रा घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे महापौर संजय नरवणे यांनीसुद्धा हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो आमसभेत चर्चिला जावा, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधिशांमध्ये एकवाक्यता नसल्याचे अधोरेखित झाले आहे. स्वच्छता कंत्राटाची प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी यासह ती पूर्वीच्या पद्धतीने राबविण्यात यावी, असे पत्र स्थायी समितीमध्ये असलेल्या आशिष अतकरे यांच्यासह भाजपच्या अनेक नगरसेवकांनी आयुक्तांकडे दिले आहे. विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी यापूर्वीच एक कंत्राटदार नेमण्याच्या प्रस्तावावर आमसभेत चर्चा व्हावी, हा प्रस्ताव आमसभेत चर्चेसाठी ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र आयुक्तांना दिले आहे. स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय ‘वन मॅन क्रॉन्टॅ्रक्टरशिप’साठी आग्रही असताना त्यांच्याच सोबत स्थायीत असलेल्या सदस्यांसह भाजपच्या अन्य सदस्यांनी त्याला पत्राद्वारे विरोध दर्शविल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शहरातील २२ प्रभाागासाठी एकापेक्षा अधिक कंत्राटदार न नेमता एकच बडा कंत्राटदार नेमण्याबाबत महापालिकेने विचार करावा, अशी सूचना आ.सुनील देशमुख यांनी ४ मार्च रोजी महापालिकेत आयोजित बैठकीत केली होती. ती सूचना या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद आहे. महापालिकेत प्रभागनिहाय विविध कंत्राटदाराऐवजी एकच मल्टिनॅशनल कंपनी येणार असल्याचे माहीत होताच कंत्राटदार लॉबी अस्वस्थ झाली. त्यांच्या भावना लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले. दुसरीकडे स्थायी समिती आणि आमसभेकडून हिरवी झेंडी मिळाल्याशिवाय कुठलाच पवित्रा घ्यायचा नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. दरम्यान ११ मे रोजी झालेल्या स्थायी समितीत अमरावती महापालिका अंतर्गत साफसफाईचा कंत्राट एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला भाजपचे बलदेव बजाज सुचक तर चंद्रकांत बोमरे यांनी अनुमोदन दिले.तर याच प्रकारचा प्रस्ताव क्रमांक ४ ने पुन्हा ठेवण्यात आला. त्या प्रस्तावाला माधुरी ठाकरे, मंजुश्री महल्ले, गंगा अंभोरे, बलदेव बजाज, हफिजाबी युसुफ शहा, नजमुन्नीसा सेय्यद मेहमूद , इशरत बानो मन्नान खॉ, शोभा शिंदे आणि सुचिता बिरे यांनी अनुमोदन दिल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमिवर भाजपच्या नगरसेवकांनी दर्शविलेल्या विरोधाला महत्व प्राप्त झाले असून या विरोधाची धार बोथट करण्यासाठी तुषार भारतीय कुठल्या अस्त्राचा वापर करतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आ. सुुनील देशमुख या कंत्राटाबाबत नेमकी कुठली भूमिका घेतात, यावर या प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून आहे.‘वन मॅन क्रॉन्ट्रॅक्टशिप’चा प्रस्ताव प्रशासनाकडे महापालिका क्षेत्रातील साफसफाईचे कंत्राट एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्यात यावा, अशी ही सभा सर्वोनुमते ठरविते आणि हा प्रस्ताव याच सभेत कायम करून मंजूर करीत असल्याचे पत्र स्थायी समितीकडून प्रशासनाला पाठविण्यात आले आहे. या ठरावाच्या उताऱ्यावर सभापती तुषार भारतीय यांची स्वाक्षरी असून याबाबत त्वरित निविदा प्रक्रिया राबवावी, अशी सूचना भारतीय यांनी केली आहे. मात्र प्रशासनाकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आमसभेत पाठविला जाणार असल्याचे संकेत आहेत.