भातकुली तालुका सरसकट नुकसान ग्रस्त घोषित करण्याची मागणी
फोटो - टाकरखेडा २५ पी
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेले कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा ताफा बोरखडीनजीक अडविण्याचा प्रयत्न करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला.
भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू, साऊर, रामा आदी भागांच्या नुकसानाचा पाहणी दौरा केल्यानंतर ना. दादाजी भुसे हे अमरावतीकडे परत येत असताना अमरावती-दर्यापूर मार्गावर बोरखडीजवळ भाजपचे भातकुली तालुकाध्यक्ष विकास देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून कृषिमंत्र्यांचा निषेधही केला.
अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात भातकुलीचाही समावेश आहे. त्यामुळे कृषिमंत्र्यांनी भातकुलीमध्येही पाहणी करायला हवी होती आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे होती. संपूर्ण तालुका खारपाणपट्टा असल्याने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, अशी मागणीदेखील या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. याचा निषेध व्यक्त करीत त्यांनी बोरखडीजवळ कृषिमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. वाहनाला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. या आंदोलनामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष विकास देशमुख, योगेश उघडे, धनंजय वलिवकर, श्रावण सातव, सवेंद्र चक्रे, विवेक रघुवंशी, गजानन काळे, उमेश झिंगळे, सुनील मंजूर, महेंद्र जोंधळे आदी भाजप कार्यकर्ता उपस्थित होते.
250721\1716-img-20210725-wa0180.jpg
कृषी मंत्री माननीय दादाजी घुसे यांचा ताफा अडवितांना भाजपचे कार्यकर्ते