शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच लढविणार सर्व जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:16 IST

जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून केवळ भाजपानेच सर्व जागांवर उमेदवार दिले आहे.

राष्ट्रवादी माघारली : काँग्रेस दोन, तर शिवसेनेने एक जागा सोडलीरवींद्र चांदेकर ल यवतमाळजिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून केवळ भाजपानेच सर्व जागांवर उमेदवार दिले आहे. राष्ट्रवादीला तब्बल १३ जागांवर उमेदवारच मिळाले नाही.जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्वच पक्षांत उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने उमेदवारी वाटपाचा खेळ नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आले. भाजपाने ऐनवेळी इतर पक्षांतून आलेल्या काही मातब्बरांना उमेदवारी बहाल केली. परिणामी केवळ भाजपालाच संपूर्ण ५५ जागांवर उमेदवार देता आले. मात्र इतर पक्षांना त्यात यश आले नाही. शिवसेनेने ५५ पैकी ५४, तर काँग्रेसने ५३ जागांवर उमेदवार दिले आहे. राष्ट्रवादीला मात्र अर्धशतकही गाठता आले नाही. राष्ट्रवादीने ५५ पैकी केवळ ४२ जागांवर उमेदवार दिले. याशिवाय मनसे, बसपानेही काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मात्र या पक्षांनाही संपूर्ण ५५ जागांवर उमेदवार मिळालेच नाही. त्यामुळे ही निवडणूक काही गटात तिरंगी, काहींत चौरंगी, तर काही गटांमध्ये पंचरंगी होण्याचे संकेत आहे. काही गटात मातब्बर अपक्षही रिंगणात असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे. छाननीदरम्यान दोन जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवारांचे अर्ज बाद झालेले आहे. त्यामुळे आता ५५ पैकी काँग्रेसचे उमेदवार केवळ ५१ गटांमध्ये लढणार आहे. विशेष म्हणजे दारव्हा तालुक्यात एका पंचायत समिती गणासाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व्यक्तीचाही अर्ज रद्द झाला आहे. इच्छुकांचे ऐनवेळी पक्षांतरआपापल्या पक्षाकडून उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या काही इच्छुकांनी ऐनवेळी पक्षांतर करून दुसऱ्याच पक्षाची उमेदवारी गळ्यात पाडून घेतली. कळंबमध्ये राष्ट्रवादीच्या एका माजी महिला पदाधिकाऱ्याने काँग्रेसची, तर अन्य एका पदाधिकाऱ्याने भाजपाची उमेदवारी मिळविली. राळेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अंतिम क्षणी भाजपाने उमेदवारी दिली. वणी तालुक्यात शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने निवडणुकीपूर्वीच भाजपात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळविली.शिवसेनच्या एकाने वर्षभरापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली. पांढरकवडा तालुक्यातही मनसे पदाधिकाऱ्याने भाजपाची उमेदवारी मिळविली. घाटंजी तालुक्यात काँग्रेसच्या दिवंगत नेत्याच्या पुत्राला भाजपाने उमेदवारी दिली. दारव्हा तालुक्यातील राष्ट्रवादीचे व उमरखेड तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाच्या गळाला लागले.