अमरावती : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी विशेष सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. कोअर कमिटीने दोघांची नावे प्रदेशपातळीवर पाठविली. आता भाजपला समर्थन देणाऱ्या युवा स्वाभिमानने सभापतिपदाची मागणी वरिष्ठ स्तरावर केल्याने रंगत वाढली आहे.विद्यमान सभापती बाळासाहेब भुयारसह आठ सदस्यांचा कार्यकाळ १ मार्चला संपुष्टात आला. तत्पूर्वी, २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजप ३, काँग्रेस ३ व एमआयएमच्या २ सदस्यांची निवड करण्यात आली. १६ सदस्यीय स्थायी समितीत नऊ सदस्य असल्याने भाजपचे बहुमत आहे. महापालिकेत मात्र भाजपला युवा स्वाभिंमानच्या तीन सदस्यांचे समर्थन आहे. यावेळी भाजपच्या तीन सदस्यांमध्ये युवा स्वाभिमानच्या एका सदस्याची निवड करण्यात आलेली आहे. स्थायी समितीची शेवटची टर्म असल्याने यावेळी युवा स्वाभिमानला सभापतिपदासाठी संधी द्यावी, ही मागणी आमदार रवि राणा यांनी भाजपच्या प्रदेशपातळीवर रेटून धरल्याची माहिती आहे. यामुळे चुरस वाढली आहे. राणांच्या या खेळीमुळे भाजप तूर्तास बॅकफूटवर आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. यासंदर्भात आमदार रवि राणा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.प्रदेशपातळीवरून होणार नावांची निश्चितीभाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नावांवर एकमत न झाल्याने दोन ते तीन नावे प्रदेशपातळीवर पाठविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. स्थायी समितीची ही सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शेवटची टर्म आहे. यामधले तीन महिने हे आचारसंहितेमध्ये जाणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्व सदस्यांनी कामे मार्गी लावण्याचे कसब या सभापतीला दाखवावे लागणार असल्याने भाजपमध्येही सभापतीचे नाव निश्चितीसाठी मंथन होत आहे.स्थायी समिती सभापतिपदासाठी सहा नावे ही प्रदेशाला पाठविण्यात आली आहेत. युवा स्वाभिमानकडून पदाविषयीची मागणी नाही- किरण पातूरकर, शहर अध्यक्ष, भाजप
युवा स्वाभिमानच्या खेळीने भाजप ‘बॅकफूटवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST
विद्यमान सभापती बाळासाहेब भुयारसह आठ सदस्यांचा कार्यकाळ १ मार्चला संपुष्टात आला. तत्पूर्वी, २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजप ३, काँग्रेस ३ व एमआयएमच्या २ सदस्यांची निवड करण्यात आली. १६ सदस्यीय स्थायी समितीत नऊ सदस्य असल्याने भाजपचे बहुमत आहे. महापालिकेत मात्र भाजपला युवा स्वाभिंमानच्या तीन सदस्यांचे समर्थन आहे. यावेळी भाजपच्या तीन सदस्यांमध्ये युवा स्वाभिमानच्या एका सदस्याची निवड करण्यात आलेली आहे.
युवा स्वाभिमानच्या खेळीने भाजप ‘बॅकफूटवर’
ठळक मुद्देउद्या विशेष सभेत निवड : कोअर कमिटीमध्ये मंथन, दोन नावे प्रदेशाला