शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आणि उघडलेच नाही ‘बिट्टीबाई’चे किराणा दुकान!

By admin | Updated: June 29, 2016 00:11 IST

नेहमी या ना त्या कारणांनी चर्चेत असलेली ही नगरी. जरा खुट्ट झाले की पेटलीच दंगल. झालीच हाणामारी. संवेदनशील शहर म्हणून अंजनगावची पोलीस दप्तरी नोंद आहे.

सामूहिक आत्मघात : अंजनगावात फक्त नि:शब्द उसासे, हादरली अवघी मानवतासंदीप मानकर/चेतन घोगरे अंजनगाव सुर्जीनेहमी या ना त्या कारणांनी चर्चेत असलेली ही नगरी. जरा खुट्ट झाले की पेटलीच दंगल. झालीच हाणामारी. संवेदनशील शहर म्हणून अंजनगावची पोलीस दप्तरी नोंद आहे. पण, मंगळवारी जे घडले ते प्रत्येक संवेदनशील मनाला हादरविणारे होते. एकाच कुटुंबातील दोन पुरूषांसह चार महिलांनी एकाच वेळी अत्याधिक जहाल विषारी औषध प्राशून जीवनयात्रा संपविली. सोमवारी रात्री निजलेले हे कुटुंब मंगळवारी दुपारपर्यंत उठलेच नाही आणि मग उघडकीस आलेले वास्तव हादरवणारे होते. ज्याने-ज्याने पाहिले, ऐकले तो नि:शब्द झाला.अंजनगाव शहरात प्रसिद्ध असलेले ‘बिट्टीबाईचे’ किराणा दुकान. चव्हाण कुटुंबाचे हे दुकान म्हणजेच त्यांचे सर्वस्व. घरातील प्रत्येक कुटुंब या दुकानासाठी झटत असे. नियमित दुकान उघडायचे. रोखीने माल आणायचा आणि रोखीनेच विकायचा, असा या कुटुंबाचा शिरस्ता. प्रफुल्ल नारायणसा चव्हाण (४८), विवेक नारायणसा चव्हाण (४०),परिसरात पेटल्या नाही चुलीअंजनगाव सुर्जी : लक्ष्मी नारायणसा चव्हाण (५०), मंगला नारायणसा चव्हाण (५२) आणि कामिनी अरूणसा बारड (२९), रोशनी अरूणसा बारड (२६) हे या कुटुंबातील सदस्य. सगळेच अविवाहित काही कारणास्तव यांची लग्ने झालीच नाहीत. यापैकी कामिनी ही दररोज सकाळी उठून दुकान उघडायची. दुकानाची झाडपूसही तीच करायची. कामिनी आणि रोशनीची आई उषाबाई बारड यांचे घर त्याच भागात थोड्या अंतरावर आहे. तेथे त्या मुलगा रोशनसह राहतात. परंतु कामिनी आणि रोशनी या आपल्या आत्या-मामांसोबत त्यांच्याच घरी राहायच्या. कामिनी आणि रोशनीचे शिक्षण अवघे दहाव्या इयत्तेपर्यंत झाले होते. त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले. कामिनी आणि रोशनीचे वडील अरूणसा यांचे आठ-दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मंगळवारी काठीपुरा परिसराला नेहमीप्रमाणे जाग आली. दिनचर्याही नेहमीप्रमाणेच सुरू झाली. पण, ‘बिट्टीबाई’चे किराणा दुकान काही उघडले नाही. दोन लहान मुली सवयीप्रमाणे दुकानात आल्या. पण, दुकान बंद. त्या परत गेल्यात. दुपारचे दीड वाजले तरी दुकानासह चव्हाण कुटुंबाच्या घरात वर्दळ नव्हती. लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. याच भागात चव्हाण कुटुंबाची ८ ते १० घरे आहेत. शेजारीच किशोर चव्हाण राहतात. लोकांनी त्यांच्याकडे शंका व्यक्त केली. त्यांनी नजीकच सावकारपुऱ्यात राहणाऱ्या उषा बारड यांचा मुलगा रोशनला सांगितले. रोशन मामाच्या घरी पोहोचला. त्यानेही बराच वेळ दार ठोठावले. पण, आतून प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस लोकांनी त्याला घरावर चढवून घरात प्रवेश करावयास सांगितले. तो आत गेला आणि आतील दृश्य पाहताच त्याची पाचावर धारण बसली. शेजारी-शेजारी पडलेले आपल्या आत्या-मामांसह सख्ख्या बहिणीचे मृतदेह पाहून त्याने हंबरडा फोडला. नागरिकांनाही एव्हाना या भयंकर घटनेची माहिती मिळाली होती. घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. अगदी शांतताप्रिय असलेल्या या कुटुंबाने केलेल्या या आत्मघातकी प्रकारामुळे प्रत्येक जण हादरला होता. डोळ्यातील अश्रूही आटले होते. नेमके काय घडले? हेच अनेकांना उमगत नव्हते. असे का व्हावे? हाच सवाल प्रत्येक जण एकमेकांना फक्त डोळ्यांनीच विचारत होता. पोलिसांनी या घटनेच्या कारणमीमांसेकरिता मृत कामिनी आणि रोशनीची आई उषा बारड यांना पोलीस ठाण्यात नेले. मृतांच्या काकू प्रमिला चव्हाण म्हणाल्या ही घटनाच अविश्वसनीय आहे. तर गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या कुटूंबाचा हा अंत हादरविणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेमुळे स्तब्ध झालेल्या काठीपुऱ्यासह आसपासच्या भागात मंगळवारी चुली पेटल्या नाहीत. जिल्हाधिकारी किरण गित्ते, माजी आमदार अरुण अडसड यांनी या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेतली.दोन बहिणींचा आधीच झालाय मृत्यूचव्हाण कुटुंबातील नारायणसा चव्हाण यांना तीन मुले आणि सहा मुली. त्यापैकी या घटनेत लक्ष्मी आणि मंगला यांचे निधन झाले. एक बहीण मोर्शीला, एक अंजनगावला तर दोन अंजनगावात राहते. एक मुलगादेखील अमरावतीलाच वास्तव्यास आहे. चार डॉक्टरांनी केले शवविच्छेदन दुपारी ३ वाजता सहा मृतदेह अंजनगावच्या रूग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले. तेथे भर पावसात कमांडोंच्या निगराणीखाली सायंकाळी ५.३० वाजता शवविच्छेदनाला सुरूवात झाली. अंजनगावचे वैद्यकीय अधीक्षक नरेंद्र सोळंके, चंद्रशेखर पाटील, अमरावती, पूनम मोरे, दर्यापूर, सुशील देशमुख, दर्यापूर या चार डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. ही प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. कृषी केंद्रानजीक प्रफुल्ल दिसल्याची चर्चा सोमवारी रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास मृत प्रफुल्ल नारायणसा चव्हाण हा बसस्थानकानजीकच्या एका कीटकनाशक औषधीच्या दुकानाजवळ फिरताना आढळल्याची चर्चा दबक्या आवाजात घटनास्थळी सुरू होती.