शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यावर तलवारीने कापला 'बर्थ डे' केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:16 IST

काँग्रेसनगर मार्गावर तक्षशिला महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री ११ वाजता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. सतीश अशोक सोनोने (२३), गजानन समाधान मेश्राम (२१), विक्की पुरूषोत्तम मोरे (२३ तिन्ही रा. वडरपुरा), आकाश यशवंत धिमारे (१९) व करण सुरेश थोरात (२१, दोन्ही रा. पंचशीलनगर) अशी आरोपींची नावे असून, या पाचही जणांना पोलीस कोठडीत रात्र काढावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेसनगर मार्गावर तक्षशिला महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री ११ वाजता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. सतीश अशोक सोनोने (२३), गजानन समाधान मेश्राम (२१), विक्की पुरूषोत्तम मोरे (२३ तिन्ही रा. वडरपुरा), आकाश यशवंत धिमारे (१९) व करण सुरेश थोरात (२१, दोन्ही रा. पंचशीलनगर) अशी आरोपींची नावे असून, या पाचही जणांना पोलीस कोठडीत रात्र काढावी लागली.काँग्रेसनगर मार्गावर काही तरूण रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या करून विक्की मोरेचा वाढदिवस साजरा करीत होते. विशेष म्हणजे, त्या तरूणाच्या हातात तलवार होती.त्या तलवारीने ते केक कापत असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेत्तृत्वात एएसआय प्रवीण घोळवे, पोलीस शिपाई विनोद चिखलकर, सतीश गाढवे, विजू राऊत, अनूप झगडे व वाहनचालक जवंजाळ यांच्यासह चोरपगार यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून पाचही तरुणांनी आपआपल्या मोटरसायकल घेऊन पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र, ते हाती लागले नाही.पोलिसांनी त्या तरुणांच्या दुचाकी क्रमांकांवरून आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानंतर पाचही जणांना मध्यरात्रीतून विविध परिसरातून अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ४/२५ आर्मअ‍ॅक्टसह कलम १४३, १४७, १४८ व १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पाचही जणांना अटक केली. या पाचही तरूणांना रात्री पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.काँग्रेसनगर मार्गावर काही तरुण तलवारीने केक कापत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस गेले असता, त्या तरुणांनी पळ काढला. दुचाकी क्रमांकावरून त्या तरुणांचा शोध घेतला. मध्यरात्री त्यांना विविध ठिकाणांवरून अटक करण्यात आली.- आसाराम चोरमले, ठाणेदार, फ्रेजरपुरा