शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

झेडपीतील कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी

By admin | Updated: February 11, 2016 00:25 IST

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळी गप्पा करणाऱ्या ..

सीईओंचे आदेश : अधिकाऱ्यांनाही द्यावी लागणार दौऱ्याची पूर्वसूचनाअमरावती : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळी गप्पा करणाऱ्या आणि अधिकाधिक वेळ पानटपऱ्या किंवा चहाच्या कँटीनवर घालविणाऱ्यांवर यामुळे वचक निर्माण होणार आहे. इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही जिल्ह्याच्या बाहेर कार्यालयीन दौऱ्यावर जायचे असल्यास सीईओंची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. सीईओंनी बुधवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलावून उपरोक्त आदेश निर्गमित केल्याने जि.प. वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी लोेकमतने जि.प. परिसरातील सर्व विभागांचे निरीक्षण करून ‘झेडपीत कार्यालयीन वेळेत शुकशुकाट’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. मनमौजी कर्मचाऱ्यांवर बसणार वचकअमरावती : यामुळे जि.प. प्रशासनाला खडबडून जाग आली आणि तडकाफडकी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सीईओ सुनील पाटील यांनी डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांना हे आदेश दिलेत. विविध कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी वेळेवर भेटत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार नेमका चालतो कसा? याबद्दल सामान्यांना उत्सुकता असते. १४ विभाग अन् हजारो कर्मचाऱ्यांचा येथे डोलारा आहे. पण, झेडपीच्या आवारातील विविध विभागात कामाच्या तासांमध्ये कर्मचारी चहाकरिता, पान टपरीवर गेलेले कर्मचारी दिसून येतात यामुळे ग्रामिण भागातून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. परिणामी वेळेपर्यंत संबंधित कर्मचारी भेटत नाहीत. अशावेळी नागरिकांना कामाविनाच परत जावे लागते. त्यामुळे या प्रकाराला आळा बसणे आवश्यक आहे. याबाबत लोकमतने जि.प.च्या सर्व विभागांना भेटी देऊन निरीक्षण नोंदविले. आणि याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, पंचायत, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, वित्त, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, सिंचन आदी विभागाच्या खातेप्रमुखांची संयुक्त बैठक घेतली. सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कामाचे ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिलेत. कार्यालयीन वेळेत कुठल्याही कर्मचाऱ्यांनी खासगी कामे करू नयते, अथवा बाहेर फिरू नये, असा प्रकार आढळल्यास यापुढे शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही सीईआेंनी खाते प्रमुखांना दिले आहेत. याशिवाय सर्व विभागात तातडीने बॉयोमेट्रिक मशीन देखील लावण्यात येणार आहेत. सर्व खातेप्रमुखांना त्यांच्या विभागातील संपूर्ण कर्मचारी हजर आहेत किंवा नाही, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अधिकाऱ्यांनाही घ्यावी लागणार पूर्वपरवानगीजिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांसोबतच अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर दौऱ्यासाठी जाताना सीईओंची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कुणीही मुख्यालय सोडू नयेत, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिले आहेत.अधिकाऱ्यांनी जारी केले ताकिदपत्रजिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या खातेप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्थ सर्व कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेनुसार कार्यालयात यावे आणि कार्यालयीन वेळेत कुणीही बाहेर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल, असे ताकिदपत्र जारी केले आहे.आता अधिकारी, कर्मचाऱ्यांची बॉयोमेट्रीक हजेरी होईल. सोबतच हजेरीपत्रकावर कार्यालय सोडण्याच्या नोंदी ठेवल्या जातील.अधिकाऱ्यांनीही पूर्व परवानगी न घेता जिल्ह्याबाहेर जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.-सुनील पाटील, सीईओ, जि.प.अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या अभ्यागताना वेळेवर कर्मचारी भेटत नाहीत. यातही सुधारणा व्हावी. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.-सतीश उईके, अध्यक्ष, जि.प.