शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

१ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी

By admin | Updated: March 31, 2016 00:11 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एरवी कर्मचारी कार्यालयीन वेळेचे पालन न करता मनमानी पध्दतीने वागतात.

जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एरवी कर्मचारी कार्यालयीन वेळेचे पालन न करता मनमानी पध्दतीने वागतात. कर्मचाऱ्यांच्या या अनियमिततेवर अंकुश लावण्यासाठी १ एप्रिल २०१६ पासून जि.प.च्या सर्वच विभागांमध्ये बॉयोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफीवर कायमचा लगाम लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी बायोमेट्रिक यंत्रणा अंमलात आणण्याकरिता प्रयत्न केले. या यंत्रणेसाठी प्रशासनाने सुमारे ३ लाख रूपयांचा प्रस्ताव तयार केला होता. आता प्रत्यक्षात या कामाला अंतिम स्वरूप प्रशासनाने दिले आहे.जिल्हा परिषदेतील लेटलतीफ कर्मचाऱ्यांची मनमानी आणि अभ्यागतांचे होणारे हाल याबाबतचा सचित्र वृत्तांत लोकमतने प्रकाशित केला होता. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी कर्मचाऱ्यांनी मनमानी, कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहण्याची सवय बाधक असल्याचा निर्वाळा दिला होता. या अनियमिततेला कायमचा लगाम लावण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या आहेत. यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात बॉयोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. आता हे कामअंतिम टप्यात आले आहे. १ एप्रिलपासून झेडपीच्या सर्व विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक मशिनवर हजेरी नोंदविली जाणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना आता वेळेवर कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेतील १४ विभागांत बायोमेट्रिक यंत्रणा बसविली जाणार आहे. यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेला आळा बसून येथे जिल्हाभरातून कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या वाट्याला येणारी प्रतीक्षा देखील संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.